Join us  

Asia Cup 2022: दूरच्या शेजाऱ्यांनी ठरवलं तर भारत फायनल खेळू शकतो, आहे आणखी एक संधी

How can India make it to the finals? श्रीलंकेने भारतावर विजय मिळवून आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या अंतिम फेरीतील  जागा पक्के केली आणि भारताचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे, पण अजूनही आशेचा किरण आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2022 11:31 PM

Open in App

How can India make it to the finals?  Asia Cup 2022, India vs Sri Lanka Live : कुसल मेंडिस व पथूम निसंका यांनी श्रीलंकेला दमदार सुरुवात करून दिली. भारताने विजयासाठी ठेवलेले १७४ धावांचे लक्ष्य हे दोघंच पार करतील असे चित्र दिसत होते. पण, युजवेंद्र चहलने ( Yuzvendra Chahal) तीन विकेट्स घेत भारताच्या आशा पल्लवीत केल्या. त्यात आर अश्विननेही १ विकेट्सची भर टाकली.  बिनबाद ९७ वरून श्रीलंकेची अवस्था ४ बाद १११ धावा अशी झाली होती. पण, श्रीलंकेचं नशीब आज जोरात होतं. २ चेंडूंत २ धावा हव्या असताना रिषभ पंत व अर्शदीप सिंग यांच्याकडून रन आऊटची संधी हुकली अन् श्रीलंकेने बाजी मारली. 

भारताकडून रोहित शर्मा व  सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५८ चेंडूंत ९७ धावा जोडल्या. रोहित ४१ चेंडूंत ५ चौकार व व ४ षटकारांसह ७२ धावांवर बाद झाला. सूर्यकुमारने ३४ धावा केल्या.   हार्दिक पांड्या ( १७), रिषभ पंत ( १७) व दीपक हुडा ( ३ ) धावांवर माघारी परतले. दिलशान मदुशंकाने २४ धावांत ३ विकेट्स घेतल्या. भारताला ८ बाद १७३ धावांपर्यंत मजल मारता आली. आर अश्विनने ७ चेंडूंत १५ धावा केल्या. प्रत्युत्तरात कुसल मेंडिस ( ५७) व पथूम निसंका ( ५२) यांनी श्रीलंकेला दमदार सुरूवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ९७ धावा जोडल्या. त्यानंतर दासून शनाका व भानुका राजपक्षा यांनी ३४ चेंडूंत नाबाद ६४ धावा करून ६ विकेट्स राखून विजय मिळवला. शनाका १८ चेंडूंत ३३ धावांवर, तर राजपक्षा २५ धावांवर नाबाद राहिला. 

भारतीय संघ कसा जाईल फायनलमध्ये?श्रीलंकेने भारतावर विजय मिळवून आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या अंतिम फेरीतील  जागा पक्के केली आणि भारताचे आव्हान जवळपास संपुष्टात आले. पाकिस्तानच्या खात्यात १ विजय आहे आणि त्यांच्या दोन लढती शिल्लक आहेत. पाकिस्तानला उर्वरित दोन सामन्यांत अफगाणिस्तान व श्रीलंका यांच्याशी खेळायचे आहे. यापैकी एक सामना जिंकल्यास पाकिस्तान अंतिम फेरीत प्रवेश करेल आणि पाकिस्तान- श्रीलंका यांच्यात जेतेपदाची लढत होईल. 

पण, भारताला अजूनही एक संधी आहे. पाकिस्तानने दोन्ही सामने गमावल्यास आणि भारताने अफगाणिस्तानला पराभूत केल्यास, सुपर ४ मधील उर्वरित तीन संघांचे प्रत्येकी एक विजय होतील. अशात ज्याचा नेट रन रेट चांगला असेल तो संघ अंतिम फेरीत जाईल. सध्याच्या घडीला पाकिस्तानचा नेट रन रेट ०.१२६ असा, तर अफगाणिस्तानचा -०.५८९ असा आहे. भारताचा नेट रन रेट -०.१२५ झाला आहे.

टॅग्स :एशिया कप 2022भारत विरुद्ध श्रीलंकापाकिस्तानअफगाणिस्तानभारत
Open in App