Join us  

टीम इंडियाच्या फलंदाजाची पत्नी भडकली, सोशल मीडियावर दिल्या शिव्या; जाणून घ्या कारण

त्या संघात पतीचं नाव टाकलं म्हणून ती भडकली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2020 5:17 PM

Open in App

बंगालचा अनुभवी फलंदाज मनोज तिवारी यानं भारतीय संघात 2008मध्ये पदार्पण करताना आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीनं सर्वांचे लक्ष वेधले होते. पण, एका मालिकेतील निराशाजनक कामगिरीमुळे त्याला संघाबाहेर करण्यात आले. त्यानं 12 वन डे आणि 3 ट्वेंटी-20 सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले. 2015मध्ये झिम्बाब्वेविरुद्धची मालिका त्याची अखेरची मालिका ठरली. त्यानंतर तो इंडियन प्रीमिअर लीगमध्ये 2017मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि 2018मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळला. पण, 2019मध्ये पंजाबनं त्याला रिलीज केलं आणि 2020मध्ये तो अनसोल्ड राहिला.

तिवारीला कारकिर्दीत अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. बंगालकडून खेळताना त्यानं अनेक अविस्मरणीय इनिंक खेळल्या. रणजी करंडक स्पर्धेत यंदा बंगालनं अंतिम फेरीत प्रवेश केला आणि त्यात तिवारीचा सिंहाचा वाटा होता. तिवारीनं 11 सामन्यांत 707 धावा केल्या. तिवारी अजूनही आयपीएल आणि टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

त्याची पत्नी सुष्मिता नेहमी त्याला प्रोत्हासन देत असते. पण, तिवारीची पत्नी सुष्मिता सोमवारी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिनं सोशल मीडियावर एका वेबसाईटला शिव्या दिल्या आहेत. एका फॅनपेजवर भारताचे अपयशी 11 शिलेदारांची नावं पोस्ट करण्यात आली आणि त्यात तिवारीचं नाव असल्यानं ती भडकली.   

अन्य महत्त्वाच्या बातम्या

हार्दिक पांड्याच्या गोड बातमीवर नताशाच्या Ex बॉयफ्रेंडनं दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

WWE स्टार खेळाडूनं घेतला जगाचा निरोप; दोन महिन्यांपूर्वी झालेलं पत्नीच निधन 

नताशाच्या 'बेबी शॉवर'ला हार्दिक पांड्याची फुल्ल टू धमाल; फोटो व्हायरल 

हार्दिक-नताशा यांनी Good News दिली, विरुष्काची डोकेदुखी वाढली; पाहा भन्नाट मीम्स!

विराट कोहलीला घाबरत नाही; पाकिस्तानच्या 17 वर्षीय गोलंदाजानं दिलं चॅलेंज

Video : युवराज सिंगच्या 'किचन 100' चॅलेंजला सचिन तेंडुलकरचं दमदार उत्तर 

Shocking : भारताच्या आंतरराष्ट्रीय तिरंदाजाचे रस्ता अपघातात निधन 

लॉकडाऊनमध्ये घरी जाण्यासाठी त्यानं चोरली बाईक; त्यानंतर जे केलं ते भारीच होतं!

 

टॅग्स :सोशल मीडियाभारतीय क्रिकेट संघ