ख्रिस गेलची शतकी खेळी विंडीजला कशी पडली महाग?

गेलचे शतक वेस्ट इंडिजसाठी तोट्याचेच; षटकार-चौकार महत्त्वाचे की धावगतीतले सातत्य, गेलच्या खेळीमुळे नवी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 01:38 PM2019-02-21T13:38:25+5:302019-02-21T13:38:51+5:30

whatsapp join usJoin us
How did Chris Gayle score a century, how expensive was the West Indies? | ख्रिस गेलची शतकी खेळी विंडीजला कशी पडली महाग?

ख्रिस गेलची शतकी खेळी विंडीजला कशी पडली महाग?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- ललित झांबरे
ब्रीजटाऊन- एकदिवसीय क्रिकेट सामन्यात कुणी १२९ चेंडूत १३५ धावांची खेळी करत असेल आणि तरी ही खेळी महागात पडली असे म्हटले जात असेल तर आश्चर्य तर वाटेलच...पण हीच चर्चा ख्रिस गेलच्याइंग्लंडविरुध्दच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातील खेळीची होतेय. खरं म्हणजे गेलच्या या १२ षटकारांनी सजलेल्या या खेळीमुळेच वेस्टइंडिजला ८ बाद ३६० असा धावांचा डोंगर रचता आला पण तोसुध्दा त्यांना विजयासाठी पुरेसा ठरला नाही. इंग्लंडने आठ चेंडू शिल्लक असतानाच आरामात हा सामना जिंकला.



इंग्लंडच्या विजयाचे श्रेय जसे शतकवीर जेसन रॉय व जो रुट यांना दिले गेले तसे विंडींजच्या पराभवाचे खापर त्यांचे गचाळ क्षेत्ररक्षण आणि ख्रिस गेलने खेळून काढलेल्या तब्बल ६१ निर्धाव चेंडूंवर (डॉट बॉल) फोडले गेले. लक्षात घ्या, ख्रिस गेलसारखा आक्रामक खेळाडू, ज्याने ह्याच खेळीत १२ षटकार लगावले तो तब्बल १० षटकं निर्धाव खेळून काढतो. साहजिकच याचा परिणाम वेस्टइंडिजच्या धावगतीवर आणि धावसंख्येवरही झाला, अन्यथा त्यांनी कदाचित ४०० धावासुध्दा उभारल्या असत्या.


गेल्या जुलैपासून पहिलाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळणाऱ्या गेलची सुरूवातच अतिशय संथ झाली. पहिल्या ३२ चेंडूत त्याने फक्त ९ धावा केल्या. त्यातही त्याला एक जीवदान लाभले. त्याने अर्धशतक पूर्ण करण्यासाठी तब्बल ७६ चेंडू घेतले आणि शतक बरोबर १०० चेंडूत साजरे केले. याच्या तुलनेत इंग्लंडच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले जेसन रॉय व जो रुट या दोघांनीही गेलपेक्षा जलद शतक व अर्धशतक साजरे केले. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी गेलएवढे षटकारसुध्दा मारले नाही. म्हणजे त्यांनी एकमेकांना फलंदाजीची संधी देत धावफलक सतत हलता ठेवली आणि इंग्लंडची धावगती सतत आवश्यकतेपेक्षा अधिक ठेवली.

  • ही तुलना पाहिली तर लक्षात येईल की गेलने शतक झळकावलं असलं, १२ षटकार लगावले असले तरी तो रॉय व रुट या दोघांपेक्षाही संथ होता आणि त्यामुळेच इंग्लंड धावगतीतही सातत्याने वेस्ट इंडिजपेक्षा पुढेच होते. 
  • दुसरी उल्लेखनीय बाब म्हणजे या सामन्यात वेस्ट इंडिजने विक्रमी २३ षटकार लगावले आणि इंग्लंडने फक्त सहा, पण चौकारांमध्ये इंग्लंडचे होते ३७ आणि विंडीजचे २१ आणि रोटेटींग द स्ट्राईक वेस्ट इंडिजपेक्षा कितीतरी सरस....
  • यावरुन एकच गोष्ट दिसून आली की मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये तुम्ही किती चौकार-षटकार मारता हे महत्त्वाचे नाही तर तुम्ही किती गतीने धावा जमवता ते अधिक महत्वाचे आहे.

Web Title: How did Chris Gayle score a century, how expensive was the West Indies?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.