- ललित झांबरेब्रीजटाऊन- एकदिवसीय क्रिकेट सामन्यात कुणी १२९ चेंडूत १३५ धावांची खेळी करत असेल आणि तरी ही खेळी महागात पडली असे म्हटले जात असेल तर आश्चर्य तर वाटेलच...पण हीच चर्चा ख्रिस गेलच्याइंग्लंडविरुध्दच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातील खेळीची होतेय. खरं म्हणजे गेलच्या या १२ षटकारांनी सजलेल्या या खेळीमुळेच वेस्टइंडिजला ८ बाद ३६० असा धावांचा डोंगर रचता आला पण तोसुध्दा त्यांना विजयासाठी पुरेसा ठरला नाही. इंग्लंडने आठ चेंडू शिल्लक असतानाच आरामात हा सामना जिंकला.
- ही तुलना पाहिली तर लक्षात येईल की गेलने शतक झळकावलं असलं, १२ षटकार लगावले असले तरी तो रॉय व रुट या दोघांपेक्षाही संथ होता आणि त्यामुळेच इंग्लंड धावगतीतही सातत्याने वेस्ट इंडिजपेक्षा पुढेच होते.
- दुसरी उल्लेखनीय बाब म्हणजे या सामन्यात वेस्ट इंडिजने विक्रमी २३ षटकार लगावले आणि इंग्लंडने फक्त सहा, पण चौकारांमध्ये इंग्लंडचे होते ३७ आणि विंडीजचे २१ आणि रोटेटींग द स्ट्राईक वेस्ट इंडिजपेक्षा कितीतरी सरस....
- यावरुन एकच गोष्ट दिसून आली की मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये तुम्ही किती चौकार-षटकार मारता हे महत्त्वाचे नाही तर तुम्ही किती गतीने धावा जमवता ते अधिक महत्वाचे आहे.