वाह रे पठ्ठ्या ; अपघातात गंभीर जखमी झालेल्या चाहत्याच्या मदतीला धावला हार्दिक पांड्या  

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यापूर्वी एका अपघातात हार्दिक पांड्याचा सच्चा चाहता मुगुंथन याचा अपघात झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 02:36 PM2019-09-26T14:36:30+5:302019-09-26T14:36:56+5:30

whatsapp join usJoin us
How Hardik Pandya helped his loyal fan who met with a serious accident ahead of Ind-SA T20I series | वाह रे पठ्ठ्या ; अपघातात गंभीर जखमी झालेल्या चाहत्याच्या मदतीला धावला हार्दिक पांड्या  

वाह रे पठ्ठ्या ; अपघातात गंभीर जखमी झालेल्या चाहत्याच्या मदतीला धावला हार्दिक पांड्या  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यापूर्वी एका अपघातात हार्दिक पांड्याचा सच्चा चाहता मुगुंथन याचा अपघात झाला. या अपघातात मुगुंथनला गंभीर दुखापत झाली होती. कुठल्यातरी सरकारी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते... पण, याची खबर लागताच हार्दिक पांड्याचा जीव कावराबावरा झाला आणि त्यानंतर हार्दिकनं जे केलं, ते वाचून सर्वांनाच त्याचा अभिमान वाटेल. हा अपघात नक्की कसा, कुठे झाला आणि याबाबत माहिती मिळाल्यानंतर हार्दिकनं नेमकं काय केलं, हे जाणून घेऊया...

आपल्या लाडक्या क्रिकेटपटूसाठी चाहते कोणत्या थराला जातील याचा काही नेम नाही. भारतात अशा प्रेमींची कमी नाही आणि यापूर्वी असे अनेक किस्से ऐकायला मिळाले आहेत. हार्दिक पांड्याच्या या चाहत्यानं स्वतःच्या शरीरावर 16 विविध भाषांत हार्दिकच नाव गोंदवून घेतलं आहे. कॉफी विथ करण 6 या कार्यक्रमात केलेल्या विवादास्पद वक्तव्यानंतर हार्दिकवर होत असलेली टीका पाहून मुगुंथन बेचैन झाला होता. हार्दिक या प्रकरणातून सुटावा आणि लवकरात लवकर टीम इंडियात त्यानं कमबॅक करावं, अशी प्रार्थना मुगुंथनने केली होती. मुगुंथनने हार्दिकची हेअरस्टाईलही कॉपी केली आहे.
 


कोईम्बतूर येथील मुगुंथन हार्दिकला चिअर करण्यासाठी धर्मशाला येथे येत असताना हा अपघात झाला. जवळपास 3000 किमीचे हे अंतर रस्त्यामार्गे गाठायचा निर्धार मुगुंथनने केला. 2000 किमचे अंतर पार केल्यानंतर जबलपूर येथे त्याचा अपघात झाला. त्याला त्वरीत नजिकच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा गंभीर दुखापत झाली होती आणि डॉक्टरांनी सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता.

वाऱ्याच्या वेगानं ही बातमी हार्दिकला समजली... मुगुंथनच्या अपघाताचे वृत्त कानावर पडताच हार्दिक अस्वस्थ झाला. त्याने त्वरित मुगुंथनच्या उपचाराचा सर्व खर्चाचा भार उचलला. उपचारानंतर 21 सप्टेंबरला मुगुंथन कोईम्बतूरला परतला. त्याने हार्दिकचे आभार मानले. 

Web Title: How Hardik Pandya helped his loyal fan who met with a serious accident ahead of Ind-SA T20I series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.