ग्राऊंड स्टाफना IPL दरम्यान मिळाली 'फाईव्ह स्टार' सेवा; कधी काळी डासांसोबत काढावी लागायची रात्र

हे आमच्यासाठी एका स्वप्नापेक्षाही कमी नाही. कधी मच्छरांसोबत, तर कधी स्टेडिअमवरच काढावी लागत होती रात्र, मराठमोळ्या कर्मचाऱ्यानं करुन दिली भावनांना वाट.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 07:05 PM2022-04-06T19:05:34+5:302022-04-06T19:06:22+5:30

whatsapp join usJoin us
how ipl 2022 Cadbury has changed life of ground staff of wankhede stadium they are staying in five star luxury hotels | ग्राऊंड स्टाफना IPL दरम्यान मिळाली 'फाईव्ह स्टार' सेवा; कधी काळी डासांसोबत काढावी लागायची रात्र

ग्राऊंड स्टाफना IPL दरम्यान मिळाली 'फाईव्ह स्टार' सेवा; कधी काळी डासांसोबत काढावी लागायची रात्र

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

वसंत मोहिते यांचं वय आहे ५७ वर्षे. सध्या त्यांच्या आयुष्यात अचानक मोठा बदल घडलाय. सध्या ते आलिशान हॉटेलमध्ये राहातायत. त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता अशा गोष्टी त्यांच्यासोबत सध्या घडतायत. खरं तर हे सर्व शक्य झालं ते आयपीएलमुळे (IPL 2022). इंडियन प्रीमियर लीगचा हा हंगाम मोहिते यांच्या आयुष्यातील एक सुंदर मैलाचा दगड ठरला. आजवर कधीही मिळाल्या नाहीत अशा अनेक गोष्टींचा सुंदर अनुभव त्यांना आता घेता येतोय.

मोहिते हे मुंबईतील वानखेडे स्टेडियमचा (Wankhede Stadium Mumbai) ग्राउंड्समन आहेत. यावेळी कन्फेक्शनरी कंपनी कॅडबरीने पंचतारांकित हॉटेल्समध्ये ग्राउंड स्टाफची राहण्याची व्यवस्था केली आहे. ग्राउंड स्टाफच्या मेहनतीकडे अनेकदा लक्ष दिले जात नाही. फार कमी लोक त्यांच्याकडे लक्ष देतात. या ग्राउंड स्टाफला सध्या डिझायनर मसाबाने डिझाइन केलेला ड्रेसही मिळाला आहे. यासोबतच खाण्यापिण्यासाठी आणि ग्राउंड ते हॉटेल आणि परतीसाठी बस, फेरीही उपलब्ध करुन देण्यात आलीये.

वसंत मोहिते यांना आताही या गोष्टी एक चमत्कारच वाटत आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. "एक दिवस मुंबई क्रिकेट असोसिएशननं आम्हाला येऊन कॅडबरी यावेळी आपल्या राहण्याची व्यवस्था करणार असल्याचं सांगितलं. ते आम्हाला कपडे आणि खाण्यापिण्याचीही व्यवस्था करतील असं म्हटलं. जोवर आयपीएलचा हा हंगाम सुरू आहे तोवर या सुविधा दिल्या जाणाक असल्याचंही समजलं," असं मोहिते म्हणाले.

"यापूर्वी अनेक समस्या होत्या"
यापूर्वी मोहिते यांचं जीवन खुपच वेगळं होतं. अनेकदा सामने रात्री उशिरा संपत असत आणि त्यानंतर त्यांचं काम. इतक्या रात्री घरीही जाणं शक्य नव्हतं. तेव्हा स्टेडिअममध्ये स्टँडखाली असलेल्या एका छोट्या खोलीत झोपावं लागत होतं. त्या ठिकाणी मच्छरही खुप असायचे. मॅच नंतर घरी जाणं शक्य नसायचं. ट्रेनही नसायच्या. जर कोणती मॅच नसेल तर सकाळी ९ वाजता आम्ही कामावर यायचो आणि संध्याकाळी सहाला घरी जायचो. परंतु मॅचच्या वेळी लवकरही यावं लागायचं आणि खुप उशिरापर्यंत थांबावं लागायचं. उशिरापर्यंत थांबल्यावर असोशिएशन तेव्हा दुप्पट पैसे देत असल्याचंही ते म्हणाले.

लाईटच लावत नाही
परंतु यावेळी चित्र मात्र निराळं आहे. परंतु काही नवी आव्हानं आहेत. त्यांच्यासाठी बल्बचं बटनच शोधणं कठिण होतं. त्यामुळे ते लाईटच लावत नाहीत. चांगली झोप तर मिळते, पण गाद्या खुपच नरम आहेत. त्यांच्यासोबत असलेले ग्राऊंडमन नितीन मोहितेही या सुविधांमुळे खूश आहेत. "ड्रेसिंग रूममध्ये जाणं आता पहिल्यापेक्षा वेगळं आहे. आमच्याकडे आमची बस आहे जे आम्हाला स्टेडिअमपर्यंत सोडते. आमच्याकडे सांगण्यासाठी शब्द नाहीत. फक्त आम्ही धन्यवाद इतकंच म्हणू शकतो," असं ते म्हणाले.

सचिनची कारकीर्द जवळून पाहिली
मोहिते यांना मुंबईच्या खेळाडूंचा प्रवास जवळून माहीत आहे. "ते माझी पूर्ण काळजी घेतात. ते येऊन माझी विचारपूस करतात. कांबळी, तेंडुलकर, अजित आगरकर यांनी मला ड्रेसिंग रूममध्ये कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेतली. अमोल मजुमदार किती मनाने खेळायचा ते मी पाहिलं आहे," अशी आठवणही त्यांनी सांगितली.

जेव्हा आपण कोणत्याही खेळाडूला नाराज पाहायचो तेव्हा दुसऱ्या खोलीत जायचो. "खेळाडूंनाही आपली स्पेस हवी असते हे सांगण्याची गरज नाही. मी त्यांना नाराज होताना, खूश होताना पाहिलं आहे. मी सचिन तेंडुलकरला रडताना पाहिलंय. आपल्या निवृत्तीच्या मॅचदरम्यान पिचकडे नतमस्तक होत त्याच्या डोळ्यातले अश्रू मी पाहिलेत. त्यावेळी माझही मन अगदी भरून आलेलं," असं मोहिते यांनी सांगितलं.

Web Title: how ipl 2022 Cadbury has changed life of ground staff of wankhede stadium they are staying in five star luxury hotels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.