अमेरिका व वेस्ट इंडिज येथे सुरू असलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ओमान ( Oman) संघाला साखळी गटातून एकही विजयाविना गाशा गुंडाळावा लागला. ऑस्ट्रेलिया, स्कॉटलंड, इंग्लंड व नामिबिया यांच्याकडून ओमानचा पराभव झाला. २०२१ नंतर ओमानचा संघ प्रथमच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळला आणि त्यांनी काही चांगली कामगिरीही करून दाखवली. पण, त्यांना रित्या हाती माघारी परतावे लागले. पण, या संघाने जपलेल्या सांस्कृतिक वैविध्यतेने सर्वांचे लक्ष वेधले. ओमान संघाचा कर्णधार झीशान मक्सूद ( Zeeshan Maqsood) याने संघातील त्यावर प्रकाश टाकला.
आयसीसीने ओमानच्या कर्णधाराशी खास गप्पा मारल्या आणि त्यात त्याला, ओमान क्रिकेट संघातील खेळाडू किती भाषा बोलतात? असा प्रश्न विचारला गेला. ओमानच्या संघात भारत आणि पाकिस्तानसह आशियातील विविध देशांतीत खेळाडू आहेत. मक्सूद २०१२ पासून ओमान संघाकडून क्रिकेट खेळतोय आणि त्याचे मुळ हे पाकिस्तान आहे. त्याच्यामते सध्याच्या ओमान संघातील खेळाडू ४ ते ५ भाषा सहज बोलतात. ओमान संघातील काही खेळाडू हे पास्तो भाषेत बोलतात, काही खेळाडू पंजाबी, उर्दू, इंग्रजी आणि अरेबिक अशा भाषाही बोलतात.
ओमानने पहिल्या सामन्यात नामिबियाला टक्कर देताना सामना सुपर ओव्हरमध्ये ११ धावांनी गमावला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून त्यांना ३९ धावांनी पराभव पत्करावा लागता. त्यानंतर स्कॉटलंडने त्यांच्यावर ७ विकेट्सने विजय मिळवला आणि इंग्लंडने त्यांचा दारूण पराभव केला. ओमानचा संपूर्ण संघ १३.२ षटकांत ४७ धावांत तंबूत परतला आणि त्यानंतर इंग्लंडने १९ चेंडूंत हा सामना जिंकला.
Web Title: How many languages does the Oman cricket team speak? Captain Zeeshan Maqsood Shows How Culturally Diverse is Oman's T20 World Cup Squad
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.