मुंबई - भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असे खेळाडू आहेत ज्यांना खेळात पुढे जाण्यासाठी शिक्षण सोडावं लागले. टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहली(Virat Kohli) हा देखील यापैकी एक नाव आहे. विराट कोहलीला १२ वीच्या पुढे शिक्षण पूर्ण करता आले नाही. अलीकडेच विराटने १० वीच्या परीक्षेची मार्कशीट शेअर करत त्याच्या चाहत्यांना खूप महत्त्वाचा संदेश दिला आहे.
कोहली सोशल मीडियावर मार्कशीट शेअर करत म्हटलंय की, हे मजेदार आहे कोणत्या गोष्टी तुमच्या मार्कशीटमध्ये सर्वात कमी जोडलेल्या असतात आणि तुमच्या चारित्र्याशी सर्वात जास्त जोडलेल्या असतात. सध्या विराट कोहली आयपीएल २०२३ साठी जोरदार तयारी करत आहे. आरसीबीचा पहिला सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. आयपीएलमध्ये विराटची तुफान बॅटिंग पाहायला मिळेल अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांना आहे.
पण याचवेळी विराटने त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. विराटनं चाहत्यांसोबत शेअर केलेल्या १० वीच्या मार्कशीटमध्ये एकूण ५ विषय आहेत परंतु सहाव्या नंबरवर स्पोर्ट्स लिहून प्रश्नचिन्ह दिला आहे. कोहलीनं २००४ मध्ये दहावीची परीक्षा दिली होती. तेव्हा त्याला इंग्रजीत ८३, हिंदी ७५, गणित ५१, विज्ञान ५५, सोशल सायन्स ८१, इंट्रोडक्टरी सायन्स ५८ असे एकूण मिळून ६९ टक्के मार्क मिळवत विराट फर्स्टक्लासमध्ये उत्तीर्ण झाला होता.
कोहली भलेही गणितात इतका हुशार नसेल परंतु रन्सच्या बाबतीत त्याच्यासारखे कुणी नाही. विराट कोहली याने रन्सचा डोंगर उभारला आहे. तो जेव्हा कधीही मैदानात उतरतो तेव्हा कुणाचा तरी रेकॉर्ड मोडीत निघतो. शाळेत असताना गणित अजिबात आवडत नसे. गणित का शिकायला हवं असं विराटला वाटायचे. त्याने काय मिळणार, दहावीत असताना मी गणितात पास व्हावे इतकेच माझं उद्दिष्ट होते. त्यानंतर हा विषय सोडण्याचा माझ्याकडे पर्याय होता असं विराट कोहलीने सांगितले.
Web Title: How many marks did Virat Kohli get in 10th?; Marksheet shared with fans
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.