आयपीएल २०२५ च्या स्पर्धेतील १८ व्या हंगामात २३ मार्चच्या सामन्याची सर्व चाहते आतुरतेनं वाट बघत आहेत. यामागचं कारण या दिवशी चेन्नईच्या चेपॉकच्या मैदानातून चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे दोन लोकप्रिय संघ आपल्या यंदाच्या हंगामाची सुरुवात करणार आहेत. या सामन्याआधी मुंबई इंडियन्सला सूर्यकुमार यादवच्या रुपात नवा कॅप्टन मिळालाय. यामागचं कारण गत हंगामात हार्दिक पांड्यावर स्लो ओव्हर रेटमुळे एका सामन्याच्या घालण्यात आलेली बंदी हे आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सूर्यकुमारनं आयपीएलमध्ये किती वेळा केलीये मुंबई इंडियन्स संघाची कॅप्टन्सी?
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादव कार्यवाहू कर्णधाराच्या रुपात दिसणार आहे. रोहित शर्मानंतर सूर्यकुमार यादव हा भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व करताना दिसते. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने कमालीची कामगिरी केल्याचा रेकॉर्डही सर्वांना माहिती असेल. पण सूर्यकुमार यादवनं आयपीएलमध्ये किती वेळा मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी केलीये हे तुम्हाला माहितीये का? इथं आपण त्याचा मुंबई इंडियन्सकडून कॅप्टन्सीची रेकॉर्डसह एकंदरीत त्याच्या नेतृत्वाती कर्तृत्वान कामगिरीबद्दल जाणून घेऊयात
मुंबईकडून कॅप्टन्सीत शंभर टक्के विनिंग रेकॉर्ड, रोहित शर्मा संघात असताना केली होती कॅप्टन्सी
सूर्यकुमार यादव आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. याआधी त्याने रोहित शर्मा संघात असताना मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व केल्याचे पाहायला मिळाले होते. २०२३ च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या लढती नियमित कर्णधार रोहित शर्मा 'इम्पॅक्ट प्लेयर' रुपात खेळला होता. या सामन्यात सूर्या दादा पहिल्यांदा मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करताना पाहायला मिळाले होते. हा सामना मुंबई इंडियन्सच्या संघानेच जिंकला होता. त्यामुळे सूर्याचा आयपीएलमधील कॅप्टन्सीची विनिंग पर्सेटेज शंभर टक्के आहे. चेन्नईच्या बालेकिल्लात ही फिगर कायम ठेवण्याचे आव्हान त्याच्यासमोर असेल.
सूर्या दादाचा कॅप्टन्सीतील एकंदरीत कामगिरी
आतापर्यंत सूर्यकुमार यादवनं भारतीय संघासह देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाकडून मिळून एकूण ४६ सामन्यात नेतृत्व केले आहे. यातील ३० सामन्यात विजय तर १२ सामन्यातील पराभवासह ३ सामने अनिर्णित आणि १ सामना टाय झाल्याचा रेकॉर्ड त्याच्या नावे आहे. एकंदरित कॅप्टन्सीतील त्याचे विनिंग पर्सेंटेज ७१.४३ असे आहे.