IPL 2022 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठी १२ व १३ फेब्रुवारीला मेगा ऑक्शन होणार आहे आणि यावेळेस इशान किशन, डेव्हिड वॉर्नर, श्रेयस अय्यर आदी खेळाडूंवर मोठी बोली लागण्याची संधी आहे. इशान किशन याच्याकडे भविष्याचा कर्णधार म्हणून अनेक फ्रँचायझी पाहत आहेत आणि त्यामुळे त्याच्यावर गुंतवणूक करण्यासाठी फ्रँचायझी प्रयत्नशील असणार आहेत. काहींच्या मते इशान किशन ( Ishan Kishan) यावेळी २० कोटींचा टप्पा ओलांडून इतिहास घडवण्याची शक्यता आहे. विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) नव्या कर्णधाराच्या शोधात आहे आणि इशान किशन त्या शर्यतीत असू शकतो. पण, मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) त्यांच्या माजी खेळाडूला असं सहजासहजी जाऊ देणार नाही. त्यामुळे २०१८प्रमाणे यंदाच्या लिलावात MI vs RCB असा सामना पुन्हा पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.
गुजरात लायन्सकडून खेळताना आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या इशान किशनसाठी २०१८च्या ऑक्शनमध्ये चेन्नई सुपर किंग्स ( CSK), RCB आणि MI यांच्यात चढाओढ रंगली होती. ४० लाखांपासून इशान किशनसाठी बोली सुरू झाली आणि २.८० कोटीपर्यंत CSK व MI या दोन फ्रँचायझी शर्यतीत होत्या. त्यानंतर चेन्नईने माघार घेतली आणि मुंबईने जवळपास ३ कोटींत इशानला ताफ्यात दाखल करून घेतलेच होते. पण, तितक्यात RCBने एन्ट्री मारली आणि इशानवरील बोली ३.२० कोटीपर्यंत गेली. या दोघांनी ६ कोटींपर्यंत इशानवर बोली लावली आणि त्यानंतर RCBलाही माघार घ्यावी लागली. मुंबई इंडियन्सने ६.२० कोटींत इशानला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले.
पाहा व्हिडीओ...