लंका प्रीमिअर लीगचे ( Lanka Premier League ) पहिले पर्व श्रीलंकेस खेळले जात आहेत. अन्य ट्वेंटी-२० लीगप्रमाणे याही लीगनं जगाचं लक्ष वेधले आहे. या लीगमध्ये भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण, मुनाफ पटेल यांच्यासह पाकिस्तान, वेस्ट इंडिज आदी देशांचे खेळाडूही खेळत आहेत. या परदेशी खेळाडूंमध्ये शाहिद आफ्रिदी, इरफान पठाण, अँजेलो मॅथ्यू, आंद्रे रसेल, थिसारा परेरा, डेल स्टेन, लेंडन सिमन्स आदी मोठी नावं आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणारे अनेक खेळाडू या लीगमध्ये आपलं नशीब आजमावत आहेत.
पण या खेळाडूंना किती मानधन मिळाले ते माहित्येय?
- ६० हजार डॉलर ( जवळपास ४४ लाख) - दासून शनाका, कुसर परेरा, अँजेलो मॅथ्यू, थिसारा परेरा
- ५० हजार डॉलर ( जवळपास ३६.७ लाख) - लेंडल सिमन्स, शाहिद आफ्रिदी, मोहम्मद हाफिज, इरफान पठाण, आंद्रे रसेल, वानिदू हसरंगा डी सिल्वा, डेल स्टेन
- ४० हजार डॉलर ( जवळपास २९.४ लाख) - सुदीप त्यागी, हझरतुल्लाह जझाई, मनप्रीत सिंग, शोएब मलिक, निरोशॅन डिकवेल, दानुष्का गुणथिलका, कुसल मेंडिस, इसुरू उदाना, अविष्का फर्नांडो
- २५ हजार डॉलर ( जवळपास १८.४ लाख) - समिथ पटेल, मोहम्मद आमीर, जॉन्सन चार्लेस, उझ्मान शिनवारी, लाहिरू कुमार, भानुका राजपक्षा, नुवान प्रदीप, दीनेश चंडीमल, धनंजया डी सिल्वा, ओशादा फर्नांडो, अकिला धनंजया, सीकूगे प्रसन्ना, अमिला ओपोन्सो, सुरंगा लकमल, कसून रजिथा, मिलिंदा सिरवर्धना, असेला गुणरत्ने, अशान प्रियांजन, बिनुरा फर्नांडो
- याशिवाय ११.२ लाख आणि २.२ लाख या पंक्तितही काही खेळाडू आहेत.