भारतीय उद्योग जगतातील 'रत्न' रतन टाटा (Ratan Tata) आता आपल्या नाहीत. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात बुधवारी रात्री उशीराने त्यांची प्राणज्योत मालवली. ते दोन दशकाहून अधिककाळ टाटा समूहाचे अध्यक्ष होते. उद्योगजगतासह अन्य क्षेत्रातील लोकांसाठीही ते 'देवदूत' होऊन पुढे आले.
वेगळवेगळ्या खेळावरील प्रेम दाखवून देत टाटांनी खेळाडूंच्या डोक्यावरही मायेचा हात ठेवल्याचे पाहायला मिळाले. यात अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. नोकरी आणि आर्थिक पाठबळ अशा स्वरुपात रतन टाटा यांनी टाटा समूहाच्या माध्यमातून खेळाडूंच कल्याण केलं आहे. परिणामी खेळाडूंचा यशाचा मार्ग अगदी सुकर झाला.
एक दोन नव्हे अनेक क्रिकेटपटूंना मिळाला टाटा समूहाचा आधार भारताचे माजी क्रिकेटर फारूख इंजिनीयर यांच्यापासून ते युवराज सिंग, हरभजन आणि शार्दूल ठाकूर या स्टार क्रिकेटर्स आणि बीसीसीआयच्या भारतीय पुरुष संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांची कारकिर्दी बहरण्यामध्येही टाटा समूहाचा वाटा खूप मोठा राहिला आहे. माजी भारतीय क्रिकेटर फारुख इंजिनीयर यांना टाटा मोटर्संकडून मोठी मदत झाली. ते या संघाकडूनही खेळायचे.
एअर इंडियाच्या अन् इंडियन एअरलाइन्सच्या माध्यमातून टाटा समूहाशी कनेक्ट झालेले क्रिकेटर
एअर इंडियाच्या माध्यमातून मोहिंदर अमरनाथ, संजय मांजरेकर, रॉबिन उथप्पा आणि व्हीव्हीएस लक्ष्मण ही मंडळी टाटा समूहाशी कनेक्ट झाली. याशिवाय इंडियन एअरलाइन्समुळं जवागल श्रीनाथ, हरभजन सिंग, युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ सारख्या खेळाडूंचा क्रिकेटमधील प्रवास यशस्वी होण्यास मदत झाली.
शार्दूल ठाकूर टाटा पॉवर तर आगरकरचं टाटा स्टीलशी खास कनेक्शन
शार्दुल ठाकूर (टाटा पॉवर) जयंत यादव (एअर इंडिया) यांनाही टाटा समूहानं पाठिंबा दिला आहे. बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता आणि माजी खेळाडू अजित आगरकर (टाटा स्टील) च्या माध्यमातून टाटा समूहाशी कनेक्ट आहेत.