शारजाह : आयपीएलच्या १३ व्या हंगामात शारजाच्या मैदानावर गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सामना रंगला. शुक्रवारच्या या सामन्यात मुंबईने कर्णधार रोहित शर्माला विश्रांती दिली आहे. रोहितच्या जागेवर किरोन पोलार्ड मुंबईच्या संघाचे नेतृत्व करीत होता. प्ले-ऑफच्या शर्यतीत असताना रोहितसारख्या खेळाडूचे दुखापतग्रस्त होणे मुंबई इंडियन्सला परवडणारे नाही. पंजाबविरुद्ध सुपरओव्हरच्या थरारनाट्यातही रोहित हॅमस्ट्रिंग इन्ज्युरीमुळे दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये मैदानात उतरला नव्हता. कदाचित रोहितची ही दुखापतीने पुन्हा उचल खाल्ली असावी,असा अंदाज आहे. रोहितला ताप देखील आला होता.
मुंबई इंडियन्सने रोहितला झालेल्या दुखापतीबद्दल माहिती दिली आहे. पंजाबविरुद्ध सामन्यात झालेल्या दुखापतीनंतर रोहित आता सावरतो आहे. गेल्या ४ दिवसांमध्ये त्याच्या तब्येतीत सुधारणा आहे. बीसीसीआयसोबत झालेल्या चर्चेनंतर टीम मॅनेजमेंटने रोहितला चेन्नईविरुद्ध सामन्यात विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.रोहित शर्माच्या जागेवर मुंबईने सौरभ तिवारीला संघात स्थान दिले आहे. कर्णधार पोलार्डने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला . चेन्नईविरुद्ध सामना झाल्यानंतर रविवारी मुंबईचा सामना राजस्थानविरुद्ध रंगणार आहे. त्यामुळे तोपर्यंत रोहित संघात पुनरागमन करतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Web Title: How serious is Rohit Sharma's injury? Pollard led Mumbai in the match against Chennai
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.