Join us

हार्दिक पांड्या-नताशा स्टँकोव्हिचच्या साखरपुड्याच्या गोड बातमीवर Ex Girlfriend उर्वशी रौतेला म्हणते...

हार्दिक पांड्यानं नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तमाम चाहत्यांना सुखद धक्का दिला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 16:44 IST

Open in App

हार्दिक पांड्यानं नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तमाम चाहत्यांना सुखद धक्का दिला. आतापर्यंत हार्दिक आणि नताशा स्टँकोव्हिच यांच्या प्रेमाच्या चर्चाच होत्या. हार्दिकनं त्याला अधिकृत दुजोरा देताना चक्क नताशासोबत साखरपुडाच उरकला. दुबईत भटकंतीला गेलेल्या हार्दिकनं भाऊ कृणालसह नजीकच्या मित्रांच्या उपस्थित हा साखरपुडा केला. नताशापूर्वी हार्दिकचं नाव इशा गुप्ता, अॅली अव्हराम आणि उर्वशी रौतेलाशी जोडले गेले... त्यांच्या नात्याच्या चर्चाही रंगल्या, परंतु हार्दिकनं फिल्मी स्टाईल प्रपोज करतान नताशासोबतच्या नात्याला दुजोरा दिला. हार्दिकनं ही गोड बातमी दिल्यानंतर सर्वांना धक्काच बसला. त्यात उर्वशीचाही समावेश होता आणि तिनं हार्दिक-नताशाच्या  साखरपुड्याच्या घोषणेवर एक पोस्ट केली. 

कृणाल पांड्यानं होणाऱ्या वहिनीचं केलं भन्नाट स्वागत!

DJ वाले बाबू ते कॉफी वाले बाबू; हार्दिक-नताशाच्या साखरपुड्यावर मीम्सचा धुमाकूळ

या साखरपुड्याला हार्दिकचा भाऊ कृणाल आणि त्याची पत्नी पंखुरी यांच्यासह काही जवळचे मित्र हजर होते. हार्दिकने ही गोड बातमी इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करून जाहीर केली. या फोटोखाली त्याने ''मै तेरा, तू मेरी, जाने सारा हिंदुस्थान, अशी कमेंट्स केली आहे. 'बादशाह' या म्युझिक व्हिडीओत DJ वाले बावू या गाण्यानं नताशाला प्रसिद्धी मिळवून दिली. हार्दिकच्या या गोड बातमीवर नताशाचा Ex-Boyfriend अली गोनीनं बोलकी प्रतिक्रिया दिली. नच बलीए या डान्स रिअ‍ॅलिटी कार्यक्रमाच्या नवव्या सत्रात नताशानं ex-boyfriend अ‍ली गोनीसह सहभाग घेतला होता. गोनीनं नताशानं शेअर केलेल्या फोटोखारी लव्ह सिंम्बॉलचे इमेज पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या.

DJ गर्ल ते हार्दिक पांड्याची प्रेयसी; नताशा स्टँकोव्हिचबद्दलच्या 'या' गोष्टी जाणून घ्याच

हार्दिक पांड्याचा लपूनछपून साखरपुडा; विराट कोहलीची अशी रिअ‍ॅक्शन

दुसरीकडे हार्दिकची Ex Girlfriend उर्वशीनं केलेल्या कमेंटनं सर्वांचे लक्ष वेधले. हार्दिक आणि उर्वशी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चाही मधल्या काळात रंगल्या होत्या. तिनं लिहिले की,''साखरपुड्याच्या शुभेच्छा.. तुमचं नातं सदैव प्रेमानं आणि आनंदानं बहरत राहुदे. तुम्हा दोघांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा..''   

टॅग्स :हार्दिक पांड्यानताशा स्टँकोव्हिचउर्वशी रौतेला