Join us  

T20 World Cup : दुष्काळात तेरावा महिना! पाकिस्तानचे सेमी फायनल गाठण्याचे वांदे, त्यात 'करो वा मरो' लढतीत स्टार फलंदाज बाहेर

Huge blow for Pakistan : ट्वेंटी-२० वर्ल्ड स्पर्धेतील पाकिस्तानचे आव्हान जवळपास संपल्यात जमा आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्याकडून झालेली हार पाकिस्तानला खूपच महागात पडली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2022 12:02 PM

Open in App

Huge blow for Pakistan : ट्वेंटी-२० वर्ल्ड स्पर्धेतील पाकिस्तानचे आव्हान जवळपास संपल्यात जमा आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्याकडून झालेली हार पाकिस्तानला खूपच महागात पडली. त्यांना आता स्वतःच्या कर्तृत्वासोबतच इतरांच्या आशीर्वादाची गरज लागत आहे. ग्रुप २ मध्ये पाकिस्तान ३ सामन्यांत १ विजय व २ पराभवासह २ गुणांची कमाई करून पाचव्या क्रमांकावर आहे. आता उर्वरित दोन सामन्यांत त्यांच्यासमोर दक्षिण आफ्रिका व बांगलादेश यांचा सामना करायचा आहे. त्यात पाकिस्तानचा संघ आणखी अडचणीत सापडला आहे. त्यांचा प्रमुख फलंदाज उर्वरित सामन्यात खेळणार नाही. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात गुडघ्याला झालेल्या दुखापीतमुळे त्याला खेळता येणार नसल्याचे PCB च्या सूत्रांनी सांगितले.

सुरेश रैना परत येतोय! चेन्नई सुपर किंग्सचा स्टार मैदानावर पुन्हा धुमशान घालणार

उस्मान कादीरच्या जागी अगदी शेवटच्या क्षणाला संघात सामील करून घेतलेल्या फाखर जमान ( Fakhar Zaman) हा पुढील सामन्यात समभाग घेणार नाही. भारत आणि झिम्बाब्वे यांच्याविरुद्धचा सामना तो खेळला नव्हता. त्यानंतर नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. त्या सामन्यात त्याच्या गुडघ्याच्या दुखापीतने डोकं वर काढलं आणि आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'करो वा मरो' सामन्यात तो खेळणार नसल्याचे वृत्त समोर आलेय. पाकिस्तान संघाचे डॉक्टर नजिबुल्लाह सोम्रो यांनी संघ व्यवस्थापनाला याबाबतची कल्पना दिली आहे.  ''फाखर जमानचं पुनरागमन करताना आम्हाला त्याच्या दुखापतीबाबतच्या धोक्याची कल्पना होती. तो संघासाठी अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. वैद्यकीय स्टाफ व संघ व्यवस्थापकांनाही याची कल्पना होती. आम्ही तरी त्याला खेळवण्याचा निर्णय घेतला. क्रिकेट किंवा अन्य खेळात रिस्क घ्यावी लागते. कधी ती यशस्वी ठरते, तर कधी डाव उलटतो,'' असे नजिबुल्लाह यांनी सांगितले. फाखरने माघार घेतल्याने आसिफ अलीचे संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. झिम्बाब्वे व नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर केले गेले होते.     

पाकिस्तानची क्वालिफाय होण्याची शक्यता

  • झिम्बाव्बेविरोधातील बांगलादेशच्या विजयानंतर सुपर १२ मधील ग्रुप २ अधिकच थरारक झाला आहे. भारतीय संघाला आपले पुढील दोन सामने बांगलादेश आणि झिम्बाव्बेसोबत खेळायचे आहेत. तीन सामन्यांनंतर चार अंकांसह भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. भारतीय संघाचा नेट रनरेट +०.८४४ आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ दोन विजय आणि ५ गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे. त्यांचा नेट रनरेट +२.७७२ आहे. पाकिस्तानला आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील.
  • पाकिस्तानला बांगलादेश आणि साऊथ आफ्रिका या दोन्ही संघांचा पराभव करावा लागेल. तसंच नेदरलँडच्या संघानं दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा पराभव केला तरी पाकिस्तानला फायदा होऊ शकतो. त्यांना नेट रनरेटकडेही लक्ष द्यावं लागणार असून त्यांना भारताच्या पुढे जावं लागेल. याशिवाय दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँडच्या सामन्यात पाऊस पडल्यासही पाकिस्तानला मदत मिळू शकेल.
  •  

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२पाकिस्तानद. आफ्रिका
Open in App