Join us  

भारताने ही चूक करू नये, अन्यथा...! आशिया चषक, वर्ल्ड कप स्पर्धेसाठी गौतम गंभीरचा 'खास' सल्ला

आशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ टप्प्यातील पहिल्या सामन्यात रविवारी भारत पुन्हा पाकिस्तानशी भिडणार आहे. राहुल संघात परत येईल अशी अपेक्षा आहे, पण तो किशनच्या जागी खेळेल का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2023 2:25 PM

Open in App

भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी KL Rahul आणि इशान किशन यांच्याबद्दलच्या वादावर बोलण्याचे टाळले असले तरी बहुतेक माजी क्रिकेटपटूंनी इशानच्या बाजूने निर्णय दिला आहे. भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये किशनपेक्षा राहुलला प्राधान्य दिल्यास गौतम गंभीरने ( Gautam Gambhir) याला “चूक” म्हटले आहे. राहुल नेहमी दोन प्राथमिक कारणांमुळे प्रथम-पसंतीचा यष्टिरक्षक-फलंदाज होता  १ ) त्याने सातत्यपूर्ण कामगिरीसह ५ नंबरचे स्थान स्वतःचे बनवले होते. २) त्याने यष्टीमागे तक्रार करण्याचे कोणतेही कारण दिले नव्हते. रिषभ पंत दुखापतग्रस्त असताना राहुलच्या कीपिंगने भारतीय वन डे संघाचा समतोल साधला. 

भारत वर्ल्ड कप २०२३ नाही जिंकणार! गौतम गंभीरने दुसऱ्याच संघाचं घेतलं नाव

IPL 2023 नंतर गोष्टी हळूहळू पण निश्चितपणे बदलू लागल्या. किशन जो त्यावेळी बॅकअप सलामीवीर म्हणून खेळत होता, त्याला यष्टीरक्षणाची जबाबदारी देण्यात आली, कारण राहुल मांडीच्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर होता. किशनने या संधीचे सोनं केलं. तो अर्धशतकांची हॅट्ट्रिकसह वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून परतला.  त्याने हे त्याच्या पसंतीच्या ओपनिंग स्लॉटवर केले. 

राहुल अजूनही पहिली पसंती होती कारण भारताला पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकणाऱ्या व्यक्तीची गरज होती. आशिया चषक स्पर्धेच्या ग्रुप स्टेजसाठी राहुल बाहेर पडला तेव्हा किशनला ५व्या क्रमांकावर फलंदाजी करायला लागली  आणि तिथेही त्याने स्वतःला सिद्ध केले. पाकिस्तानविरुद्ध भारताची अवस्था ४ बाद ६६ अशी झाली असताना किशनने ( ८२) हार्दिक पांड्यासोबत पाचव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी करून भारताला संकटातून बाहेर काढले. "भारताने केएल राहुलच्या पुढे इशान किशनला खेळवले नाही तर मोठी चूक होईल," असे मत गंभीरने स्टार स्पोर्ट्सवर सांगितले.

भारताचा आणखी एक माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा म्हणाला की, किशन नेहमीच दबावाखाली चांगला खेळ करून दाखवला आहे. भारतीय संघात त्याचे स्थान कधीच सुरक्षित झाले नाही, परंतु जेव्हाही त्याला संधी मिळाली तेव्हा त्याने नेहमी धावा केल्या आहेत. “इशान किशनला फारशी संधी मिळत नाहीत, पण जेव्हा तो संधी मिळवतो तेव्हा त्याच्यावर दबाव असतो. त्याने द्विशतक झळकावले आहे आणि त्यानंतरही त्याला जास्त संधी मिळाली नाही, ही वस्तुस्थिती आहे,” असे चोप्रा  म्हणाला.

आशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ टप्प्यातील पहिल्या सामन्यात रविवारी भारत पुन्हा पाकिस्तानशी भिडणार आहे. राहुल संघात परत येईल अशी अपेक्षा आहे, पण तो किशनच्या जागी खेळेल का? असे दिसते की वर्ल्ड कप स्पर्धेत जाण्यापूर्वी भारताला त्याच्या फिटनेसची चाचणी घ्यायची आहे.  

टॅग्स :एशिया कप 2023गौतम गंभीरभारत विरुद्ध पाकिस्तानइशान किशनलोकेश राहुल
Open in App