नागपूर टेस्टपूर्वी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनवरून प्रचंड गोंधळ; तीन दिग्गजांनी निवडली टीम...

तीन दिग्गज प्लेअरनी त्यांच्या त्यांच्या टीम बनवून हे कन्फ्यूजन आणखी वाढविले आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 10:17 PM2023-02-08T22:17:14+5:302023-02-08T22:18:04+5:30

whatsapp join usJoin us
Huge Confusion over Team India's Playing XI Ahead of Nagpur Test Vs Australia; Team selected by three veterans... | नागपूर टेस्टपूर्वी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनवरून प्रचंड गोंधळ; तीन दिग्गजांनी निवडली टीम...

नागपूर टेस्टपूर्वी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनवरून प्रचंड गोंधळ; तीन दिग्गजांनी निवडली टीम...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत ऑस्ट्रेलियामध्ये ४ कसोटी सामने खेळविले जाणार आहेत. क्रिकेटप्रेमींसाठी ही एक मोठी पर्वणी आहे. असे असताना टीम इंडियात कोणाचे सिलेक्शन होणार यावरून प्रचंड गोंधळ दिसत आहे. अशातच तीन दिग्गज प्लेअरनी त्यांच्या त्यांच्या टीम बनवून हे कन्फ्यूजन आणखी वाढविले आहे. 

नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (व्हीसीए स्टेडियम) होणाऱ्या या सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल याविषयी सर्वजण बोलत आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकांमध्ये खेळलेल्या धुरंधरांनी स्वतःची इलेव्हन समोर ठेवली आहे. 

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी पणाला लागली आहे आणि ती जिंकण्यासाठी भारत-ऑस्ट्रेलिया संघ काहीही करायला तयार आहे. या सामन्यात टीम इंडियाकडून कोणते अकरा महारथी मैदानात उतरतील याची नावे अद्याप समोर आलेली नसली तरी दिग्गजांनी आपल्या इलेव्हनबद्दल मत व्यक्त केले आहे. टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने निवडलेली प्लेईंग इलेव्हन सर्वात चांगली आहे. 

हरभजनची टीम...
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, केएस भरत (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज

आरपी सिंग
आरपी सिंगच्या आरपीची टीम हरभजनपेक्षा पूर्णपणे वेगळी दिसते. या संघात सूर्यकुमार यादवला स्थान मिळालेले नाही आणि अक्षर पटेलच्या जागी कुलदीप यादवला स्थान मिळाले आहे.


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज


दिनेश कार्तिक
दिनेश कार्तिकनेच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये शुभमन गिलला वगळण्यात आले आहे. 
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, केएस भरत (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज

Web Title: Huge Confusion over Team India's Playing XI Ahead of Nagpur Test Vs Australia; Team selected by three veterans...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.