IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ला सुरुवात होण्यास आता अवघे सहा दिवस बाकी आहेत. २२ मार्चला गतविजेता चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होणार आहे. पण, खेळाडूंच्या दुखापतीचे सत्रही सुरू झाले आहे. मोहम्मद शमी, लुंगी एनगिडी यांच्यासारख्या काही खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. तर काही खेळाडू सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे आणि त्यापैकी एक CSK चा डेव्हॉन कॉनवे आहे... दुखापतीमुळे तो सुरुवातीच्या काही सामन्यांत खेळणार नसल्याचे CSK ला आधीच धक्का बसला आहे, त्यात आणखी एक भर पडली आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या भरवशाचा भीडू ४ ते ५ आठवडे क्रिकेटपासून दूर राहणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.
टाईम्समधील एका अहवालानुसार श्रीलंकेचा युवा वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे चार ते पाच आठवडे मैदानाबाहेर जाणार आहे. ६ मार्च रोजी बांगलादेश विरुद्ध सिल्हेट येथे झालेल्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात त्याला दुखापत झाली आणि त्याला स्पेल पूर्ण न करता मैदान सोडावे लागले, तेव्हापासून पथिराना मैदानापासून बाहेर आहे. मागील आयपीएलमध्ये CSKच्या विजेतेपदाच्या वाटचालीत पथिरानाने १२ सामन्यांत १९ विकेट्स घेतल्या होत्या.
"ग्रेड १ हॅमस्ट्रिंग पूर्णपणे बरे होण्यासाठी साधारणपणे दोन आठवडे लागतात. त्यामुळे, पथिराना संघात कधी सामील होतो हे पाहणे बाकी आहे आणि तो सुरुवातीच्या काही सामन्यांसाठी उपलब्ध होईल की नाही हे या टप्प्यावर सांगणे कठीण आहे," असे आयपीएलच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले.
न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे अंगठ्याच्या शस्त्रक्रियेनंतर आयपीएल २०२४च्या किमान पहिल्या सहामाहीला मुकण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध न्यूझीलंडच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यादरम्यान कॉनवेच्या बोटाला दुखापत झाली होती.
IPL 2024मधील चेन्नई सुपर किंग्सच वेळापत्रक२२ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, रात्री ८ वा.पासून, चेन्नई२६ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा.पासून, चेन्नई३१ मार्च - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम