दीर्घकाळापासून कॅन्सरशी झुंज देत असलेल्या बॉलिवूड दिग्गज अभिनेता इरफान खान याचे आज निधन झाले. काल अचानक तब्येत बिघडल्यामुळे इरफानला कोकिलाबेन रुग्णालयात आयसीयूमध्ये भरती करण्यात आले होते. इरफान लवकर बरा व्हावा, यासाठी चाहते प्रार्थना करत असताना त्याच्या मृत्यूची बातमी आली आणि चाहते शोकसागरात बुडाले.
दोन वर्षांपूर्वी 2018 मध्ये इरफानने त्याच्या आजाराबद्दल आपल्या फॅन्सना सांगितले होते. इरफानला न्यूरो इंडोक्राइन ट्यूमर हा आजार होता. इरफानच्या आजारावर लंडनमध्ये उपचार सुरु होते. दीर्घकाळ उपचार घेतल्यानंतर सप्टेंबर 2019 मध्ये इरफान भारतात परतला होता. यानंतर त्याने ‘अंग्रेजी मीडियम’ या सिनेमाचे शूटींग सुरू केले होते. नुकताच हा सिनेमा रिलीज झाला होता़ हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला.
भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाननं अभिनेता इरफान खानला श्रद्धांजली वाहिली. पण, यावेळी इरफाननं अभिनेत्यासोबतचं आगळंवेगळं कनेक्शन सांगितलं. इरफाननं ट्विट केलं की,''भारताच्या चित्रपटसृष्टीला हा मोठा धक्का आहे, परंतु त्यानं साकारलेल्या भूमिका आपल्यात कायम राहतील. लोकं इरफान खानचं कौतुक करताना अनेकदा त्याच्याऐवजी मला मॅसेज टॅग करायचे. त्याची माझी कधीच भेट झाली नाही, परंतु त्याच्यासोबतचं हे माझं आगळंवेगळं कनेक्शन होतं.''
त्या वेदना मी समजू शकतो..., इरफानच्या जाण्यानं भावुक झाला Yuvraj Singh
इरफान खान यांचे काम अमर राहील, क्रीडा विश्वानं वाहिली श्रद्धांजली
इरफान गेल्या वर्षी उपचारामुळे झाला होता पूर्णपणे बरा, या आजाराला दिली होती झुंज
मै आपके साथ हूँ भी और नहीं भी...! इरफानचे ते शब्द ठरले अखेरचे...!!
नाही राहिला माझा प्रिय मित्र...सुजीत सरकारने व्यक्त केली खंत, बॉलिवूडही हळहळलं