कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी संपूर्ण देश एकजुटीनं लढाई देत आहे. पण, काही माथेफिरू लोकं यातही जात-धर्माची पोळी शेकवत आहेत. भारतीय संघाचा माजी गोलंदाज इरफान पठाणनं अशा लोकांना सज्जड दम भरला आहे. त्यानं इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करून जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना मार्मिक टोला लगावला आहे. यापूर्वीही इरफाननं हैदराबाद इन्काऊंटर, जेएनयू हिंसा, दिल्ली दंगल या सर्व प्रकरणावर स्पष्ट मत मांडले होते. आता त्यांनी धर्माच्या नावाखाली चालणारा धंदा बंद करा, असे आवाहन केले आहे.
पठाण बंधूंचे समाजकार्यात एक पाऊल पुढे; गरजूंसाठी दान केले 10 हजार किलो तांदूळ
क्रिकेटपटू पठाण बंधूंची समाजसेवा; कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी करतायत मदत
पोस्ट केलेल्या व्हिडीओत तो म्हणतो,''जगाच्या निर्मितापासून धर्माच्या नावाखाली धंदा सुरू आहे. पण, खेदाची बाब ही की समजुतदारही आंधळा होत चालला आहे. काही मोजक्या लोकांनी धर्माचा धंदा सुरू केला, आता हा धंदा पण घाणेरडा होत चालला आहे. तुम्ही आपसात भांडाल आणि त्याला फायदा तिसराच उचलेले. आता तरी सुधरा, आता तर तुमच्याकडील वेळही कमी होत चालला आहे.''
पाहा व्हिडीओ...
लाजीरवाणा प्रकार; समाजकार्य करणाऱ्या इरफान पठाणवर नेटिझन्सकडून टीका
केरळ राज्याचं कौतुक...इरफाननं यावेळी केरळ राज्याचे कौतुक केले. तो म्हणाला,''कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी केरळ राज्य चांगलं काम करत आहे. गेल्या 24 तासांत केवळ एकच कोरोना रुग्ण तेथे सापडला आहे. ते योग्य पाऊल टाकत आहेत.. त्यांनी देशात सर्वाधिक चाचण्याही केल्या आहेत.''
इंग्लंडच्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील खेळाडूची कोरोनाशी लढाई; प्रकृती चिंताजनक