विजय हजारे, सय्यद मुश्ताक अली आदी स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करूनही पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याचे भारतीय संघात पुनरागमन होत नव्हते. पण, BCCI ने अखेर त्याच्या कामगिरीची दखल घेतली आणि न्यूझीलंड अ संघाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी भारत अ संघात त्याची निवड केली. BCCIच्या या घोषणेनंतर काही वेळातच पृथ्वी शॉने झंझावाती शतक झळकावले. त्याच्या या शतकी खेळीत ६२ धावा या चौकार-षटकारांची १४ चेंडूंत आल्या.
कोईम्बतूर येथे दुलीप चषक स्पर्धेतील पश्चिम विभाग विरुद्ध मध्य विभाग ( West Zone vs Central Zone) असा सामना सुरू आहे. पृथ्वी शॉ व राहुल त्रिपाठी यांची अर्धशतकं व शॅम्स मुलानी व तनूष कोटीयन यांच्या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर वेस्ट झोनने २५७ धावा उभ्या केल्या. कुमार कार्तिकेयाने ६६ धावा देताना ५ विकेट्स घेऊन वेस्ट झोनचे कंबरडे मोडले. यशस्वी जैस्वाल ( ०), अजिंक्य ( ८) हे आघाडीचे फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर पृथ्वी शॉ व राहुल त्रिपाठी यांनी वेस्ट झोनचा डाव सावरला. पृथ्वीने ७८ चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने ६० धावा केल्या, तर राहुलने १५१ चेंडूंत ५ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ६७ धावा जोडल्या. अरमान जाफर २३ धावांवर माघारी परतला अन् पुन्हा वेस्ट झोनचा डाव गडगडला. मुलानीने ४१ व कोटियनने ३६ धावा करून वेस्ट झोनला २५७ धावांपर्यंत पोहोचवले.
भारताच्या अष्टपैलू खेळाडूला Live Match मध्ये चेंडू लागला, अॅम्बूलन्समधून न्यावे लागले हॉस्पिटलमध्ये
प्रत्युत्तरात जयदेव उनाडकटनेही कमाल केली .त्याने त्याच्या १० षटकांत ३ विकेट्स घेताना सेंट्रल झोनचा निम्मा संघ ६६ धावांवर माघारी पाठवला. KKR चा स्टार वेंकटेश अय्यर ( Venkatesh Iyer ) फलंदाजी करत असताना चिंतन गाजाच्या गोलंदाजीवर चेंडू त्याला लागला अन् तो रिटायर्ट हर्ट झाला. सेंट्रल झोनचा पहिला डाव १२८ धावांवर गुंडाळून वेस्ट झोनने १२९ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात पृथ्वीने दमदार खेळ केला, परंतु यशस्वी ( ३), अजिंक्य ( १२), राहुल (०) हे लगेच माघारी परतले. पण, पृथ्वीने दमदार खेळ करताना ८८ चेंडूंत शतक झळकावले. त्याच्या शतकी खेळीत ११ चौकार व ३ षटकारांचा समावेश होता. पृथ्वीच्या या शतकामुळे वेस्ट झोनने ३ बाद १३० धावा अशी मजल मारून २५९ धावांची आघाडी घेतलीय...
न्यूझीलंड अ विरुद्धच्या मालिकेसाठी भारत अ संघपृथ्वी शॉ, अभिमन्यू इस्वरन, ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, रजत पाटीदार, संजू सॅमसन ( कर्णधार), केएस भरत ( यष्टिरक्षक), कुलदीप यादव, शाबाज अहमद, राहुल चहर, तिलक वर्मा, कुलदीप सेन, शार्दूल ठाकूर, उम्रान मलिक, नवदीप सैनी, राज अंगद बावा ( India A squad: Prithvi Shaw, Abhimanyu Easwaran, Ruturaj Gaikwad, Rahul Tripathi, Rajat Patidar, Sanju Samson (Captain), KS Bharat (wicket-keeper), Kuldeep Yadav, Shabhaz Ahmed, Rahul Chahar, Tilak Varma, Kuldeep Sen, Shardul Thakur, Umran Malik, Navdeep Saini, Raj Angad Bawa)