Join us  

ऑली पोपसारखा चमत्कार भारतीय फलंदाजाने केला, संघ अडचणीत असताना ठोकले शतक 

भारत-इंग्लंड यांच्यात हैदराबाद येथे सुरू असलेल्या कसोटीत ऑली पोपने शानदार १९६ धावांची खेळी करून पाहुण्यांना सामन्यावर पकड घेऊन दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 4:02 PM

Open in App

भारत-इंग्लंड यांच्यात हैदराबाद येथे सुरू असलेल्या कसोटीत ऑली पोपने शानदार १९६ धावांची खेळी करून पाहुण्यांना सामन्यावर पकड घेऊन दिली. पहिल्या डावात १९० धावांनी पिछाडीवर असलेल्या इंग्लंडने भारतासमोर २३१ धावांचे आव्हान उभे केले. भारताचा डाव मात्र गडगडलेला दिसतोय आणि त्यांनी ७ फलंदाज ११९ धावांवर गमावले आहेत. दरम्यान, ऑली पोपसारखा चमत्कार भारतीय फलंदाजाने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर केला. Ranji Trophy 2024 च्या सामन्यात मुंबई आणि उत्तर प्रदेश भिडत आहेत. 

वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात मुंबईचा पहिला डाव १९८ धावांवर गडगडला. उत्तर प्रदेशने कर्णधार नितिश राणाच्या ( १०६) शतकाच्या जोरावर ३२४ धावा उभ्या केल्या. समर्थ सिंग ( ६३) व अक्ष दीप नाथ ( ४१) यांनी महत्त्वाची खेळी केली. १२६ धावांच्या पिछाडीचं ओझं घेऊन मैदानावर उतरलेल्या मुंबईची दुसऱ्या डावातही पडझड पाहायला मिळाली. जय बिस्ता ( २१) व भुपेन लालवानी ( २७) यांच्यानंतर मुंबईला धक्के बसले. कर्णधार अजिंक्य रहाणे ( ९) पुन्हा अपयशी ठरला. सुवेध पारकर ( ८), तनुष कोटियन ( ३) व पी पवार ( ४) यांनीही विकेट फेकल्या. त्यामुळे मुंबईची अवस्था ६ बाद ८६ अशी झाली होती.

पण, तुफान फॉर्मात असलेल्या शिवम दुबेने ( Shivam Dube) मुंबईचा डाव सावरला आणि सोबतीला शाम्स मुलानी उभा राहिला. शिवमने १२९ चेंडूंत ९ चौकार व ७ षटकारांच्या मदतीने नाबाद ११७ धावांची खेळी करून संघाला ७१ षटकांत ६ बाद २५९ धावांपर्यंत पोहोचवले. मुंबईने आता १३३ धावांची आघाडी घेतली आहे आणि मुलानी ५५ धावांवर खेळतोय.. दुबेकडून आणखी मोठ्या खेळीची मुंबईकरांना अपेक्षा आहे. 

 

टॅग्स :रणजी करंडकमुंबईउत्तर प्रदेश