लंडन : कोरोना विषाणूमुळे क्रीडाविश्वही थांबले असून, अनेक महत्त्वाच्या स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. आता या स्पर्धांमध्ये इंग्लंडसाठी सर्वांत महत्त्वपूर्ण असलेल्या ‘हंडेÑड लीग’ स्पर्धेचाही समावेश झाला आहे. यंदा होणारी ही लीग कोरोना विषाणूच्या संकटामुळे पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) घेतला आहे. यंदा जुलै महिन्यात होणारी ही स्पर्धा आता २०२१ मध्ये खेळविण्यात येईल.‘ईसीबी’ने यावर माहिती देताना सांगितले की, ‘इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे की, ‘दी हंडेÑड’ लीगचे आयोजन आता २०२१ सालच्या उन्हाळ्यामध्ये करण्यात येईल. हा निर्णय घेण्याआधी या स्पर्धेच्या आयोजनाविषयी गंभीर चर्चा झाली होती. यानंतर यंदाच्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन करणे बोर्डासाठी शक्य नसल्याचे स्पष्ट झाले.’ ‘ईसीबी’ने पुढे सांगितले की, ‘कोरोना विषाणूमुळे या स्पर्धेच्या आयोजनासाठी अनेक प्रकारची आव्हाने होती. यामध्ये सामाजिक अंतर राखणे, स्टेडियम्सची कमतरता अशा आव्हानांचा समावेश होता. शिवाय प्रेक्षकांविना ही स्पर्धा खेळविणे चुकीचे ठरले असते; कारण जास्तीतजास्त प्रेक्षकांना क्रिकेटकडे वळविणे हाच या स्पर्धेचा उद्देश आहे.’‘ईसीबी’चे सीईओ टॉम हॅरिसन म्हणाले की, ‘यंदा आम्ही निर्धारित लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरलो, याचे दु:ख आहे. सुरक्षितपणे खेळाला पुढे नेण्याचे काम करू तेव्हा २०२१ साली ‘दी हंडेÑड’ स्पर्धेला सुरुवात होईल.’>आधीच वर्तविण्यात आलेला अंदाज‘ईसीबी’ने याआधीच कोरोनाच्य संकटामुळे आपल्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन जुलै महिन्यापर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासूनच ‘दी हंडेÑड’ लीग स्पर्धाही पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलण्यात येईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ‘दी हंड्रेड’ लीग स्पर्धाही झाली स्थगित
‘दी हंड्रेड’ लीग स्पर्धाही झाली स्थगित
यंदा होणारी ही लीग कोरोना विषाणूच्या संकटामुळे पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) घेतला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 4:17 AM