वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारतीय संघ बारबाडोसमध्ये चक्रीवादळात अडकला होता. गेल्या तीन दिवसांपासून बीसीसीआय सचिव जय शाह, टीम इंडिया, टीम इंडियासोबत गेलेला क्रू देखील हॉटेलमध्येच बसून होता. करोडो चाहते त्यांच्या परत येण्याची वाट पाहत होते. अखेर टीम इंडियाला घेऊन एअर इंडियाचे विमान भारताकडे झेपावले आहे.
एअर इंडियाचे AIC24WC विमान भारताकडे यायला निघाले आहे. उद्या सकाळपर्यंत भारतीय संघ दिल्लीत पोहोचणार आहे. तीन दिवसांपासून बारबाडोसच्या आकाशात चक्रीवादळ घोंघावत होते. यामुळे तेथील विमानतळ बंद करण्यात आले होते. बुधवारी सकाळी टीम इंडिया भारतात येईल अशी बातमी आली होती. परंतू, धोका टळला नसल्याने एक दिवसाचा विलंब झाला होता.
आता टीम इंडियाचे खेळाडू विमानात बसले आहेत. भारतीय संघ स्थानिक वेळेनुसार रात्री २ वाजता निघाला आहे, तिथून दिल्लीला पोहोचायला १६ तास लागतात. यानुसार उद्या भारतीय वेळेनुसार सकाळी सहा वाजता दिल्लीत पोहोचणार आहे.
बेरिल चक्रीवादळाने बारबाडोसमध्ये जास्त नुकसान केलेले नाहीय. आता हे चक्रीवादळ जमैकाच्या दिशेने जात आहे. याशिवाय हैती आणि डॉमनिक प्रजासत्ताक या देशांनाही धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
Web Title: Hush...! Indian team leaves with World Cup; Dubey posted the photo from Barbados t20 world cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.