मुंबई : सुरक्षा पुरविण्यास अतिरिक्त ताण येण्याच्या कारणास्तव मुंबई पोलिसांनी वानखेडे स्टेडियवर होणाऱ्या भारत वि. वेस्ट इंडिज टी२० सामन्यास सुरक्षा बंदोबस्त पुरविण्यास नकार दिल्यानंतर बीसीसीआयने या मालिकेच्या वेळापत्रकात थोडा बदल केला आहे. यानुसार ६ डिसेंबरला मुंबईत होणारा सामना आता हैदराबादला होईल, तर ११ डिसेंबरला मुंबईत सामना होईल.
विंडीजविरुद्धच्या टी२० मालिकेतील पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार पहिला टी२० सामना ६ डिसेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार होता. मात्र त्याच दिवशी अयोध्या प्रकरणामुळे आणि डॉ. बाबासाहेब आंबडेकर महापरिनिर्वाण दिन असल्याने मुंबई पोलिसांनी सामन्यासाठी सुरक्षा पुरविण्यास असमर्थता दर्शविली होती.
यानंतर टी२० मालिकेच्या वेळापत्रकात छोटा बदल करण्यात आला आणि बीसीसीआयच्या एका अधिकाºयाने याविषयी म्हटले की, ‘मुंबई आणि हैदराबाद येथे खेळविण्यात येणाºया टी२० सामन्यांच्या स्थळांमध्ये अदलाबदली करण्यात आली आहे.
हैदराबाद क्रिकेट संघटनेचे (एचसीए) अध्यक्ष मोहम्मद अझरुद्दिन यांच्याकडून सहमती मिळाल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला.’ त्याचवेळी, अझरुद्दिन यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे वेळापत्रकात बदल करणे शक्य झाले. अन्यथा मुंबईकडून यजमानपद काढून घेण्यात आले असते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
Web Title: Hyderabad will face T20 on December 3
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.