इंदूर : भारतीय अष्टपैलू व मोठे फटके खेळण्याच्या क्षमतेमुळे विशेष ओळख निर्माण करणा-या हार्दिक पांड्याने षटकार ठोकणे मला लहानपणापासून आवडत असल्याचे म्हटले आहे. मैदानाबाहेर चेंडू मारणे मला विशेष आवडते, असेही त्याने सांगितले.यंदाच्या मोसमात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चारवेळा षटकारांची हॅट््ट्रिक लगावणा-या पांड्याने सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की,‘षटकार तर मी सुरुवातीपासून मारत आहे. फरक केवळ हा आहे की, आता मी सर्वोच्च पातळीवरच्या क्रिकेटमध्ये षटकार लगावत आहे. तसे मी बालपणापासून षटकार लगावत आहोत. पाकविरुद्धच्या लढतीमुळे माझा खेळ बदलला असे तुम्हाला वाटत असेल. मला त्याची काहीच अडचण नाही.’आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २८ डावांमध्ये ४० षटकार लगावणाºया पांड्याने पाकविरुद्धच्या ७६ धावांच्या खेळीबाबत सांगितले की,‘त्यापूर्वी आयपीएलमध्ये माझी कामगिरी चांगली ठरली होती. त्यापूर्वीच्या मोसमात मला चांगली कामगिरी करता आली नव्हती, पण मी कसून मेहनत घेतली आणि दमदार पुनरागमन केले. मी नेहमीच स्वत:ला प्रेरित करतो. ते महत्त्वाचे असते.’ (वृत्तसंस्था)सकारात्मक विचारमोठे फटके खेळण्याबाबत पांड्या म्हणाला, ‘यासाठी खेळाची समज असणे महत्त्वाचे आहे.सकारात्मक विचार व विश्वास यावर सर्वकाही अवलंबून आहे. जर मला वाटले की षटकार लगावला पाहिजे तर मी खेळाची माहिती घेतो आणि मोठे फटके खेळतो.’नैसर्गिक खेळपांड्याने तिसºया वन-डेमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. पांड्या म्हणाला,‘ज्यावेळी मी फलंदाजीला आलो त्यावेळी मला नैसर्गिक खेळ करण्याची सूचना देण्यात आली होती. त्यामुळे फिरकीपटूंविरुद्ध वर्चस्व गाजवण्याची रणनीती होती. त्यात आम्ही यशस्वी ठरलो.कुठल्या क्रमांकावर फलंदाजी करतो, यामुळे विशेष फरक पडत नाही. त्याकडे आव्हान म्हणून न बघता संघासाठी काही विशेष करण्याची संधी म्हणून बघतो.मला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास सांगण्यात आले त्यावेळी मला आनंद झाला. वन-डेमध्ये प्रथमच मला एवढे चेंडू खेळण्याची संधी मिळाली. ’
- Cricket Buzz»
- बातम्या»
- मी नेहमीच स्वत:ला प्रेरित करतो, मैदानाबाहेर चेंडू मारणे मला विशेष आवडते - हार्दिक पांड्या
मी नेहमीच स्वत:ला प्रेरित करतो, मैदानाबाहेर चेंडू मारणे मला विशेष आवडते - हार्दिक पांड्या
भारतीय अष्टपैलू व मोठे फटके खेळण्याच्या क्षमतेमुळे विशेष ओळख निर्माण करणा-या हार्दिक पांड्याने षटकार ठोकणे मला लहानपणापासून आवडत असल्याचे म्हटले आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:49 AM