Join us  

तुमच्या आई, बहीण, मैत्रीण अन् पत्नीसारखीच मी पण एक स्त्री! धनश्री वर्माचा भावनिक Video

झलक दिखला जा ११ या डान्स रिॲलिटी शोमध्ये फायनलिस्ट राहिलेली धनश्री कोरिओग्राफर प्रतीक उतेकरसोबत एका फोटोत दिसली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 6:17 PM

Open in App

युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा ( Dhanashree Verma ) हिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रोल्सचा सामना केला आहे. २७ वर्षीय धनश्रीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये तिला ट्रोलर्समुळे सहन कराव्या लागलेल्या त्रासाबद्दल तिने मन मोकळे केले आहे. अलीकडे धनश्रीचे काही फोटो व्हायरल झाल्यानंतर तिला ट्रोल केले गेले होते.  झलक दिखला जा ११ या डान्स रिॲलिटी शोमध्ये फायनलिस्ट राहिलेली धनश्री कोरिओग्राफर प्रतीक उतेकरसोबत एका फोटोत दिसली होती. त्यानंतर चहलच्या चाहत्यांनी तिच्यावर जोरदार टीका केली. धनश्रीने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, या संपूर्ण परिस्थितीचा तिच्या आणि तिच्या कुटुंबाला खूप त्रास झाला आहे.

“तुला हे कसं वाटतंय? कोणताही निर्णय किंवा मत मांडण्यापेक्षा आधी प्रश्न विचारणे आणि माणूस होणे  सोपे आहे. माझ्या आयुष्यात मी कधीच ट्रोल किंवा मीम्सकडे लक्ष दिले नाही. अगदी अलीकडील ट्रोलपर्यंत... माझ्या या वागण्यात नक्कीच खूप परिपक्वता होती. पण, यावेळी माझ्यावर परिणाम होण्याचे कारण म्हणजे,  त्याचा माझ्या कुटुंबावर आणि माझ्या जवळच्या आणि प्रियजनांवर परिणाम झाला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांना तुमचे मन मांडण्याचे स्वातंत्र्य असल्याने तुम्ही आमच्या आणि कुटुंबाच्या भावनांचा विचार करत नाही,” असं ती म्हणाली.

ट्रोलर्समुळे होणाऱ्या त्रासापासून शांतता मिळवण्यासाठी सोशल मीडियातून ब्रेक घेतल्याचे धनश्रीने सांगितले. “सोशल मीडियावर नकारात्मकता पसरवली जात आहे. आपण हे माध्यम इतकं नकारात्मक बनवलं, तर आपण जे काही करत आहोत तेच मोठ्या प्रमाणावर द्वेष आणि असंतोष पसरवणं आहे. सोशल मीडिया हा माझ्या कामाचा प्रमुख भाग आहे आणि मी हार मानू शकत नाही, म्हणूनच मी धैर्य एकवटले आहे व इंस्टाग्रामवर परत आले आहे,”असेही धनश्री म्हणाली.

ती पुढे म्हणाली, “फक्त तुम्हांला विनंती करतो की तुम्ही थोडे अधिक संवेदनशील व्हा. आमच्या कलागुणांवर व कौशल्यांवर लक्ष केंद्रित करा कारण दिवसाच्या शेवटी, आम्ही सर्वजण तुमच्या मनोरंजनासाठी या माध्यमात आलो आहोत. मी देखील तुमच्या आई, बहीण, मैत्रीण, पत्नी यांच्यासारखीच एक स्त्री आहे हे विसरू नका. मी एक फायटर म्हणून ओळखली जाते आणि मी कधीही हार मानत नाही. मी येथे आहे आणि मी पुन्हा हार मानणार नाही. पण प्रेम पसरवा, काही गोष्टींबद्दल संवेदनशील रहा आणि द्वेष पसरवू नका. मला खरोखर आशा आहे की इथून पुढे आपण सर्व चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू आणि आयुष्यात पुढे जाऊ.” 

टॅग्स :युजवेंद्र चहलऑफ द फिल्ड