भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण (Irfan Pathan Wife Blur Photo) याने त्याची पत्नी सफा बेग हिचा चेहरा ब्लर करून सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आणि त्यानंतर नवा वाद सुरू झाला आहे. सोशल मीडियावर इरफानवर टीका होत आहे आणि अनेकांनी इऱफानवर प्रश्नांचा भडीमार केला. अनेकांनी इरफानला स्त्री-पुरूष समानतेची आठवण करून दिली आणि इरफानला या फोटोसाठी स्पष्टीकरण द्यावं लागलं.
इरफान म्हणाला,''हा फोटो माझ्या मुलाच्या अकाऊंटवरून पोस्ट केला गेला आहे. हा फोटो पाहून माझ्यावर अनेकांनी टीका केली. माझ्या पत्नीनं स्वतःहून तिचा चेहरा ब्लर केला आहे. आणि हा, मी तिचा मालक नाही, तर जोडीदार आहे.''
इरफान पठाणनं याआधीही अनेकदा पत्नीसह फोटो पोस्ट केले आहेत, परंतु त्या प्रत्येक फोटोत तिचा चेहरा झाकलेला दिसत आहे. नुकतंच इरफान पत्नीसोबत रूसमध्ये गेला होता आणि तेथील फोटोतही सफाचा चेहरा झाकलेला दिसत आहे.
इरफाननं २०१६मध्ये सफा बेगसह लग्न केलं. सफा बेग ही आखाती देशांत मॉडल होती. हैदराबाद येथे 28 फेब्रुवारी 1994 साली तिचा जन्म झाला. पण, ती लहानाची मोठी सौदी अरेबियात झाली आणि तिथेच तिनं शिक्षण पूर्ण केलं. हैदराबाद येथे 28 फेब्रुवारी 1994 साली तिचा जन्म झाला. पण, ती लहानाची मोठी सौदी अरेबियात झाली आणि तिथेच तिनं शिक्षण पूर्ण केलं. इरफान आणि सफा यांची दुबईत भेट झाली होती. दोन वर्षांच्या प्रेम संबंधानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
इरफान-युसूफ पठाण यांना सलाम; कोरोना संकटात ९०,००० कुटुंबीयांचे भरले पोट अन् अजूनही मदतकार्य सुरूचWeb Title: 'I am Her Mate, Not Her Master': Irfan Pathan Responds to Criticism on Wife's Blurred Picture
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.