भारताचा स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्या पासून विभक्त झालेली नताशा स्टँकोव्हिच सातत्याने सोशल मीडियावरील हटके पोस्टमुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करताना दिसते. सध्याच्या घडीला ती मुंबईत असून अनेकदा ती जिवलग मित्र अलेक्झांडर ॲलेक्स इलिकसोबत स्पॉट झाली आहे. त्यामुळे दोघांच्यात डेटिंगचा खेळ सुरु असल्याची चर्चाही रंगल्याचे पाहायला मिळाले. त्यात आता नव्या व्हिडिओची भर पडलीये.
जिवलग मित्रानं शेअर केला व्हिडिओ
सतत नताशाच्या मागे पुढे करणारा तिचा मित्र अलेक्झांडर ॲलेक्स इलिक याने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन नताशासोबतचा एक खास व्हिडिओ शेअर केलाय. यात दोघ जोडीनं डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय.
I am in Love साँगमुळं रंगली दोघांच्यात प्रेमाचं सेंटिंग झाल्याची चर्चा
दिवाळी पार्टीसाठी तयार झाल्यावर दोघांनी अगदी रोमँटिक अंदाजात डान्स स्टेप्स केल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते. एवढेच नाही तर या व्हिडिओसाठी जोडीनं जे गाणं निवडलंय त्यात I am in Love हे बोल आहेत. त्यामुळे हार्दिक पांड्यापासून वेगळी झाल्यानंतर नताशा पुन्हा आपली नवी इनिंग सुरु करण्याच्या तयारीला लागली आहे, अशा प्रतिक्रिया या व्हिडिओवर उमटताना दिसत आहेत. नताशा अन् अलेक्झांडरची जोडी जमलीये असा सीन या व्हिडिओमुळे क्रिएट झाला आहे. दोघांनी मात्र नात्याबद्दल मौनचं बाळगल्याचे दिसून येते.
परफेक्ट मॅचिंग अन् कमालीची केमिस्ट्री
व्हिडिओमध्ये नताशानं ब्लॅक अँण्ड गोल्डन कलरची साडी नेसल्याचे दिसते. दुसरीकडे अलेक्झांडर ॲलेक्स इलिक गोल्डन आणि क्रीमी कलरमधील आउटफिटमध्ये दिसतो. परफेक्ट मॅचिंग प्रमाणेच या जोडीतील केमिस्ट्रीही कमालीची असल्याचे दिसून येते. पार्टी असो वा जिम नताशासोबत अलेक्झांडर ॲलेक्स इलिक सोबत दिसतोच. प्रसिद्ध डिझायनर अबू जानी-संदीप खोसला यांच्या दिवाळी पार्टीतही दोघांची खास झलक पाहायला मिळाली. हार्दिक पांड्याच्या चाहत्यांना मात्र हा सीन चांगलाच खटकताना दिसतोय. नताशाची पोस्ट पडली की, तिला ट्रोल करण्याचा सिलसिला या व्हि़डिओवरील कमेंटमध्येही दिसून येतो.
Web Title: I am in Love Natasa Stankovic Dance Aleksandar Alex ilic move hardik pandya video goes Viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.