Yuzvendra Chahal RJ Mahvash Viral Photo, IPL 2025: चेन्नई सुपर किंग्ज संघाची हाराकिरी यंदाच्या हंगामात सुरूच आहे. पहिला सामना जिंकल्यानंतर चेन्नईने सलग चार सामन्यात पराभवाचा सामना केला. पंजाब किंग्जने मंगळवारच्या सामन्यात CSK वर १८ धावांनी विजय मिळवला. पंजाबचा सलामीवीर प्रियांश आर्य याने ४२ चेंडूत १०३ धावांची झंझावाती खेळी केली आणि संघाला २१९ धावांपर्यंत मजल मारून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना डेवॉन कॉनवेच्या ६९ धावांच्या बळावर चेन्नईला २० षटकात केवळ २०१ धावांपर्यंतच मजल मारता आली. धोनी फटकेबाजी करत होता, पण मोक्याच्या वेळी युजवेंद्र चहलने त्याचा झेल टिपला. त्यावेळी त्याची रुमर्ड गर्लफ्रेंड आरजे महावश हिने स्टेडियममध्ये जल्लोष केल्याचे दिसले. त्यानंतर आता त्या दोघांचा एक फोटो व्हायरल झाला असून त्यातील गाण्याने अनेकांचे लक्ष वेधले आहे.
युजवेंद्र चहलचा घटस्फोट होण्याआधीपासूनच तो आणि आरजे महावश अनेकदा एकत्र दिसले. या दोघांमध्ये अफेअर असल्याच्या चर्चाही रंगल्या. याबाबत कुणीही अधिकृत माहिती दिली नाही. पण IPLच्या सामन्यांमध्ये आरजे महावश युजी चहलला सपोर्ट करताना दिसली. तसेच, युजीने धोनीचा झेल घेतल्यावर आनंद साजरा करतानाही दिसली. त्यानंतर सामना संपल्यावर युजी चहलने एक इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली. त्यात ते दोघे एकत्र पोज देताना दिसले. महत्त्वाची बाब म्हणजे त्या स्टोरीवर एक गाणेही पोस्ट केले. सलमान खानच्या ट्युबलाईट सिनेमातील हे गाणे. त्यातील युजीने या स्टोरीवर टाकण्यासाठी निवडलेले शब्द होते, "तू मेरा हुकुम का इक्का, तू ही मेरी क्रिकेट का छक्का... मैं अलादीन, तू मेरा जिन्न... मैं अधूरा तेरे बिन". संपूर्ण गाण्यातील याच ओळी निवडल्याने चाहतेही यावर कमेंट करताना दिसत असून दोघांचे रिलेशनशिप जवळपास कन्फर्म झाल्याचे म्हणत आहेत.
दरम्यान, पंजाब विरूद्ध चेन्नई सामन्यावेळी स्टेडियम स्टँडमध्ये RJ महावश दिसली आणि आधीच चर्चा रंगल्या. चहल आणि महावश दोघे एकमेकांसोबत डेट करत असल्याची चर्चा रंगत आहे. त्यात आता ती पंजाबच्या संघाला सपोर्ट करताना दिसली त्याने चाहते अधिकच चर्चा करू लागले. स्टेडियममधील तिचे फोटो व्हायरल झाले. पंजाबसह चहलला चीअर करण्यासाठी ती आली होती हे साऱ्यांनाच लक्षात आले. स्टँडमधील तिची उपस्थिती हाच चहलसोबत ती रिलेशनशिप असल्या पुरावा आहे, अशी चर्चाही रंगू लागली. त्यातच सामन्यानंतर गाण्यातील या शब्दांसह पोस्ट केलेल्या इन्स्टास्टोरीमुळे चहलने प्रेमाची कबुली दिली असेच म्हटले जात आहे.