मुंबई : हिंदू असल्यामुळे माझ्यावर पाकिस्तानच्या खेळाडूंनी अन्याय केला, असे मत फिरकीपटू दानिश कनेरियाने मांडले होते. आता, मला हिंदू असल्याचा गर्व आहे, अशी ठाम भूमिका कनेरियाने मांडली आहे.
कनेरिया म्हणाला की, " मी हिंदू असूनही पाकिस्तानच्या संघातून खेळलो. त्यामुळे मला हिंदू असल्याचा गर्व आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने मला १० वर्षे खेळण्याची संधी दिली. पण खेळाडूंनी मात्र माझ्यावर नेहमीच अन्याय केला. पाकिस्तानच्या खेळाडूंनी मला नेहमीच सापत्न वागणूक दिली."
कनेरिया पुढे म्हणाला की, " पाकिस्तानचे खेळाडू माझ्या पाठीमागे टीका करायचे. माझ्याबद्दल काहीही बोलायचे. पण मी त्यांच्याकडे कधीही लक्ष दिले नाही. मी नेहमीच त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आलो. कारण माझे लक्ष क्रिकेटवर आणि संघाला विजय मिळवून देण्यावर असायचे. पाकिस्तानमधील बऱ्याच लोकांनी माझे समर्थन केले आहे, मी त्यांचा कायम ऋणी राहीन."
दानिश कनेरिया हा पाकिस्तानच्या मीठाला जागलाच नाही; जावेद मियाँदाने केली जळजळीत टीका
पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया हा हिंदू होता, म्हणून त्याच्यावर अन्याय करण्यात आला, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी माजी गोलंदाज शोएब अख्तरने केले होते. त्यानंतर या गोष्टीवर भरपूर वाद झाला. पण आता पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांनी कनेरियावर जोरदार टीका केली आहे.
मियाँदाद यांनी सांगितले की, " कनेरियाबद्दल जे काही सुरु आहे ते घृणास्पद आहे. कनेरिया पाकिस्तानच्या मीठाला जागलेला नाही. कारण कनेरिया जे म्हणतोय ते साफ खोटे आहे. जर कनेरिया हा हिंदू होता आणि त्याच्यावर पाकिस्तानने अन्याय केला तर त्याला संघात स्थानच मिळाले नसते. कनेरियावर अन्याय झाला असेल तर तो दहा वर्षे संघाकडून कसा खेळला असता?"
मियाँदाद पुढे म्हणाले की, " कनेरिया आणि शोएब अख्तर हे सध्या संघात नाहीत. ते निवृत्त झालेले आहेत. त्यामुळे त्यांचा बोर्डाशी काहीही संबंध नाही. पण बोर्डाने धर्मावरून कधीही अन्याय केला नाही. त्यामुळे या दोघांच्या वक्तव्याला किती प्रसिद्धी द्यायची आणि त्यावर किती चर्चा करायची, हे ठरवायला हवे."
Web Title: I am proud to be a Hindu; Danish Kaneria presents strong role
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.