भारताविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतील पराभवानंतर श्रीलंकेच्या संघात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. श्रीलंकेला 2020 वर्षाची सुरुवात पराभवानं करता आली. तीन सामन्यांच्या या ट्वेंटी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर टीम इंडियानं पुढील दोन सामने जिंकून मालिका 2-0 अशी खिशात घातली. श्रीलंकेचा कर्णधार लसिथ मलिंगाला या मालिकेत एकही विकेट घेतला आली नाही आणि त्यानं पराभवाची जबाबदारी स्वीकारली.
या मालिकेनंतर मलिंगानं निवड समितीसमोर कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा बॉम्ब टाकला. या मालिकेत गोलंदाजांना टीम इंडियाच्या फलंदाजांना बाद करण्यात अयपश आले, शिवाय फलंदाजांनाही मोठी भागीदारी उभी करता आली नाही. मलिंगा म्हणाला,मला विकेट घेता आली नाही. त्यामुळे मी कोणत्याही क्षणी नेतृत्वाच्या जबाबदारीतून मुक्त होण्यास तयार आहे.''
मलिंगाच्या नेतृत्वाखाली श्रीलंका आयसीसी ट्वेंटी-20 क्रिकेटच्या क्रमवारीत आठव्या स्थानी कायम आहे. वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियानंही श्रीलंकेवर निर्भेळ यश मिळवलं होतं. ऑक्टोबर महिन्यात होणारा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून श्रीलंका क्रिकेट संघ व्यवस्थापन काही मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. भारताविरुद्धच्या दोन सामन्यांत मलिंगानं 4-0-40-0 आणि 4-0-41-0 अशी गोलंदाजी केली.
कर्णधार म्हणून 20पेक्षा अधिक ट्वेंटी-20 सामन्यांत सर्वाधिक पराभव पत्करण्याचा विक्रम मलिंगाच्या नावावर नोंदवला गेला आहे.
लसिथ मलिंगा 31.8% ( 8 विजय /22 सामने)
शकिब अल हसन 33.3% ( 7/21)
मुश्फीकर रहीम 34.8% ( 8/23)
मशरफे मोर्ताझा 35.7% ( 10/28)
कार्लोस ब्रेथवेट 36.7% ( 11/30)
Web Title: 'I am ready to quit', Lasith Malinga takes onus after Sri Lanka's 0-2 humiliation vs Team India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.