भारताविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतील पराभवानंतर श्रीलंकेच्या संघात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. श्रीलंकेला 2020 वर्षाची सुरुवात पराभवानं करता आली. तीन सामन्यांच्या या ट्वेंटी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर टीम इंडियानं पुढील दोन सामने जिंकून मालिका 2-0 अशी खिशात घातली. श्रीलंकेचा कर्णधार लसिथ मलिंगाला या मालिकेत एकही विकेट घेतला आली नाही आणि त्यानं पराभवाची जबाबदारी स्वीकारली.
मलिंगाच्या नेतृत्वाखाली श्रीलंका आयसीसी ट्वेंटी-20 क्रिकेटच्या क्रमवारीत आठव्या स्थानी कायम आहे. वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियानंही श्रीलंकेवर निर्भेळ यश मिळवलं होतं. ऑक्टोबर महिन्यात होणारा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून श्रीलंका क्रिकेट संघ व्यवस्थापन काही मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. भारताविरुद्धच्या दोन सामन्यांत मलिंगानं 4-0-40-0 आणि 4-0-41-0 अशी गोलंदाजी केली.
कर्णधार म्हणून 20पेक्षा अधिक ट्वेंटी-20 सामन्यांत सर्वाधिक पराभव पत्करण्याचा विक्रम मलिंगाच्या नावावर नोंदवला गेला आहे.लसिथ मलिंगा 31.8% ( 8 विजय /22 सामने) शकिब अल हसन 33.3% ( 7/21)मुश्फीकर रहीम 34.8% ( 8/23)मशरफे मोर्ताझा 35.7% ( 10/28)कार्लोस ब्रेथवेट 36.7% ( 11/30)