भारत-पाकिस्तान या शेजाऱ्यांचे राजकिय संबंध प्रचंड ताणले गेले आहेत. पाकिस्तानातून दहशतवादी कृत्यांना मिळणाऱ्या खतपाणीमुळे भारतानं त्यांच्याशी सर्व संबंध तोडले आहेत. पण, हे संबंध सुधारण्यासाठी भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकेच्या आयोजनाच्या चर्चा वारंवार शेजाऱ्यांकडून घडवल्या जात आहेत. आता पुन्हा अशीच चर्चा सुरू झाली आहे आणि यात पाकिस्तानचा यष्टिरक्षक कामरान अकमल याची भर पडली आहे. त्यानं या चर्चेत भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली याचं नाव ओढलं आहे. भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका पुन्हा सुरू व्हावी अशी गांगुलीचीही इच्छा आहे, परंतु तो त्यावर उघड बोलू शकत नाही, असा दावा अकमलनं केला आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यात २०१२-१३मध्ये अखेरची द्विदेशीय मालिका झाली होती. उभय संघ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात. अकमल म्हणाला,''सौरव गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष होणे ही महत्त्वाची बाब आहे. त्यानं पाकिस्तानविरुद्ध अनेक सामने खेळले आहेत आणि या दोन्ही देशांतील क्रिकेट मालिका होण्याचं महत्त्व तो जाणतो. भारत-पाकिस्तान मालिका व्हावी, अशी त्याचीही इच्छा आहे असं मला वाटतं. तो तसा विचारही करतोय, याची मला खात्री आहे.''
अरे बापरे; सामना सुरू असताना वेस्ट इंडिजचे दोन खेळाडू मैदानावर कोसळले, स्ट्रेचरवरून नेलं थेट हॉस्पिटलमध्ये!
भारत-पाकिस्तान मालिका सुरू होण्यासाठी आयसीसीही मोठी भूमिका बजावू शकते. तो म्हणाला,''जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत दोन्ही संघ समोरासमोर आले, तर दोन्ही देशांमधील संबंध सुधारतील. ''
भारत-पाकिस्तान मालिकेबाबत ICC चेअरमन ग्रेग बार्कले यांचं मोठं विधान
न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले यांनी ICC चेअरमनपदाची सूत्रे हाती घेताना भारत-पाकिस्तान द्विदेशीय मालिकेबाबत मोठे विधान केले होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI) आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळ ( PCB) यांच्यातील संबंधाबाबत बार्कले यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले होते की,''हे प्रकरण क्रिकेट पलिकडचे आहे, परंतु या दोन देशांमधील क्रिकेट संबंध सुधारण्यासाठी आयसीसीकडून सकारात्मक पाऊल उचलले जाईल, याची मी खात्री देतो. भारत-पाकिस्तान क्रिकेट संबंधापलीकडे मला अन्य गोष्टींचा विचार करायचा नाही. उभय देशांमध्ये असलेल्या सीमावादाचीही मला कल्पना आहे.''
''आयसीसी म्हणून आम्हाला जे शक्य आहे, ते आम्ही करूच आणि भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा क्रिकेट सुरू होईल, यासाठी प्रयत्न करू. त्यापलीकडे उभय देशांमधील अन्य मुद्यांवर हस्तक्षेप करण्याची पात्रता नाही. क्रिकेटचा विचार केल्यास, उभय देशांना पुन्हा एकमेकांविरुद्ध खेळताना पाहणे, आम्हालाही आवडेल,''असेही बार्कले यांनी सांगितले होते.
Web Title: I am sure Sourav Ganguly wants Indo-Pak cricket's resumption but can't say it openly: Kamran Akmal
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.