Virat Kohliचा फॉर्म पाकिस्तानविरुद्ध खराबच रहावा, Wasim Akramची 'दुवा'; बाबर आजमसोबतच्या तुलनेवरही विधान

Wasim Akram on Virat Kohli: Asia Cup 2022 मध्ये 28 ऑगस्टला भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) यांच्यातल्या हाय व्होल्टेज सामन्याची सर्वांना आतुरता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 03:44 PM2022-08-23T15:44:50+5:302022-08-23T15:46:00+5:30

whatsapp join usJoin us
I am sure Virat Kohli will come back, he is a great player. Just hope he doesn’t come back to form against Pakistan, Wasim Akram on Virat Kohli | Virat Kohliचा फॉर्म पाकिस्तानविरुद्ध खराबच रहावा, Wasim Akramची 'दुवा'; बाबर आजमसोबतच्या तुलनेवरही विधान

Virat Kohliचा फॉर्म पाकिस्तानविरुद्ध खराबच रहावा, Wasim Akramची 'दुवा'; बाबर आजमसोबतच्या तुलनेवरही विधान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Wasim Akram on Virat Kohli: Asia Cup 2022 मध्ये 28 ऑगस्टला भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) यांच्यातल्या हाय व्होल्टेज सामन्याची सर्वांना आतुरता आहे. विराट कोहलीचा फॉर्म हा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, कारण आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत विराटचे फॉर्मात येणे महत्त्वाचे आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर विराट पुन्हा विश्रांतीवर गेला आणि आता तो आशिया चषक स्पर्धेतून पुनरागमन करणार आहे. मागील वर्षी वर्ल्ड कप स्पर्धेतील पराभवानंतर भारतीय संघ प्रथमच पाकिस्तानचा सामना करणार आहे.  पाकिस्तानविरुद्धचा सामना हा विराटचा 100 वा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामना आहे. अशात पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम याने विराटच्या फॉर्माबाबत मोठं विधान केले आहे.

विराट कोहलीने 99 ट्वेंटी-20 सामन्यांत 50.12 च्या सरासरीने 3308 धावा केल्या आहेत. विराटच्या फॉर्मावर माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले, माझं विराट कोहलीसोबत मागील काही दिवसांत बोलणं झालेलं नाही, तो मोठा खेळाडू आहे आणि योग्य वेळी तो त्याचा खेळ उंचावतोय. आशिया चषक स्पर्धेपूर्वी विराटचा खराब फॉर्म येऊन गेला, हे एकप्रकारे चांगलेच आहे. पाकिस्तानविरुद्ध त्याने 50+धावा केल्यास लोकं सर्व काही विसरतील.  ‘Shaz and Waz’ या कार्यक्रमात ते वसीम अक्रम सोबत सहभागी झाले होते.

पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम यानेही विराटवर टीका करणाऱ्यांना सुनावले. तो म्हणाले, सोशल मीडियावर चाहते व मीडियाकडून विराटवर होणारी टीका चुकीची आहे. तो ऑल टाईम ग्रेट खेळाडू आहे. तो अजून 33 वर्षांचा आहे आणि मला खात्री आहे, तो जबरदस्त कमबॅक करेल. पण, त्याचे हे कमबॅक पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत होऊ नये, अशी आशा करतो.  

बाबर आजम वि. विराट कोहली?

बाबर आजम आणि विराट कोहली यांच्यात होणारी तुलना नैसर्गिक आहे. मी जेव्हा खेळत होतो तेव्हा इंझमाम-उल-हक आणि सचिन तेंडुलकर यांच्यात तुलना व्हायचीय. त्याआधी जावेद मियादाँद व सुनील गावस्कर अशी तुलना व्हायची. ऑल टाईम ग्रेट होण्याच्या दिशेने बाबरची वाटचाल सुरू आहे, परंतु त्याला अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे. 

Web Title: I am sure Virat Kohli will come back, he is a great player. Just hope he doesn’t come back to form against Pakistan, Wasim Akram on Virat Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.