दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) यानं शुक्रवारी हॉस्पिटलमध्ये दाखल होत असल्याचे ट्विट केलं. पाच दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते आणि तो होम क्वारंटाईन झाला होता. पण, शुक्रवारी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होत असल्याची माहिती त्यानं दिली. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये नुकताच तो खेळला होता आणि त्याच्यापाठोपाठ युसूफ पठाण, इरफान पठाण व एस बद्रीनाथ यांचा कोरोना रिपोर्टही पॉझिटिव्ह आढळला. वसीम अक्रमचा जुना फोटो पाहून पत्नीनं केलं ट्रोल; पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज म्हणाला, ती अंडरवेअर नाही!
सचिननं ट्विट केलं की, ,''तुमच्या शुभेच्छा व प्रार्थनेचे आभार. वैद्यकिय सल्ल्यानुसार मी हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहे. काही दिवसांतच घरी पुन्हा येईल, अशी आशा आहे. स्वतःची काळजी घ्या आणि इतरांनाही सुरक्षित ठेवा. वर्ल्ड कप विजयाला १० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सर्व भारतीय व संघातील सहकाऱ्यांना शुभेच्छा. ''
या ट्विटनंतर त्याची प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी असे मॅसेज येत आहेत. पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज वसीम अक्रम यानंही ट्विट करून सचिनच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे. ''१६व्या वर्षी तू जगातील सर्वोत्तम गोलंदाजांचा मोठ्या धैर्यानं सामना केलास. मला खात्री आहे की तू कोव्हीड-१९लाही सीमापार टोलावशील. लवकर बरा हो मास्टर. २०११च्या वर्ल्ड कप विजयाच्या १०व्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्सच्या स्टाफसोबत केल्यास आनंद होती. त्याचे फोटो पाठवायला विसरू नकोस.''