महिला क्रिकेट टी-२० वर्ल्ड कपच्या तोंडावर इंग्लंडची कर्णधार हीथर नाइट हिला १२ वर्षांपूर्वीच्या चुकीमुळे माफी मागावी लागली आहे. नकळतपणे झालेल्या जुन्या कृत्यामुळे तिला चांगलीच चपराक बसली. याशिवाय १००० युरो इतका दंडही ठोठावण्यात आला होता. पण चूक मान्य केल्यामुळे महिला क्रिकेटला यातून सुटही मिळाली. हा सर्व तिच्या एका जुन्या आणि व्हायरल होणाऱ्या फोटोमुळ घडला. तिचा जो फोटो व्हायरल झाला तो 'ब्लॅकफेस' फोटो २०१२ मध्ये कॅप्चर करण्यात आला होता. त्यावर आता कारवाई झाली. या जुन्या प्रकरणामुळे इंग्लंड महिला क्रिकेट संघाची कर्णधार हीथर नाइटवर तोंडघशी पडण्याची वेळ आली.
महिला क्रिकेटरचे ते वर्तन "वर्णद्वेषी आणि भेदभावपूर्ण"
ऑक्टोबरपासून युएईमध्ये रंगणाऱ्या महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी हीथ नाइट हिने आपल्या त्या कृत्याबद्दल माफी मागितली आहे. माझ्याकडून जे कृत्य झालं त्याचा खरंच खेद वाटतो, असे ती म्हणाली आहे. क्रिकेट शिस्त आयोगाचे न्यायाधीश टिम ओ'गॉरमन यांनी हे महिला क्रिकेटरचे वर्तन "वर्णद्वेषी आणि भेदभावपूर्ण" होते अशी टिपण्णी केली आहे. पण महिला क्रिकेटरनं ते जाणीवपूर्वक केलेले नाही, असा उल्लेखही या प्रकरणात आयोगाकडून करण्यात आला.
२१ वर्षांची असताना कॅप्चर करण्यात आला होता तिचा तो वादग्रस्त ठरणारा फोटो
हीथर नाईट हिला ज्या फोटोवरून माफी मागण्याची वेळ आली तो फोटो ती २१ वर्षांची असताना काढण्यात आला होता. २०१२ मध्ये केंट येथील एका क्रिकेट क्लबमधील स्पोर्ट्स थीम फॅन्सी ड्रेस पार्टीत महिला क्रिकेटर 'ब्लॅकफेस' सह सहभागी झाली होती. तिचे हे कृत्य कृष्णवर्णीय लोकांच्या भावना दुखावणारे ठरले. ज्यामुळे १२ वर्षांनी या प्रकरणात तिच्यावर हात जोडण्याची वेळ आली.
हीथर नाइटनं अशा व्यक्त केल्या मनातील भावना
या प्रकरणात हीथर नाइटनं आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. २०१२ मध्ये माझ्याकडून जी चुक झाली त्याची खरंच माफी मागते. ती गोष्ट अयोग्य होती. मला त्या गोष्टीचा आजही पश्चाताप वाटतो. माझ्या मनात कोणताही चुकीचा उद्देश नव्हता. आता जे कळतं त्या गोष्टी मी त्यावेळी समजू शकले नाही. त्या गोष्टीचा काय परिणाम होईल, याची कल्पनाही नव्हती. समाजातील अल्पसंख्याकांना क्रीडा क्षेत्रात समान संधी मिळालला हवी, यासाठी समाज माध्यमाच्या माध्यमातून सर्वोत्तपरी प्रयत्न करीन, असेही तिने म्हटले आहे.
फोटो क्लिक केला त्यावेळी तिला काहीच कल्पना नव्हती हीथर नाइटने संबंधित फोटो आपल्या कोणत्याही सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केला नव्हता. हा फोटो एका दुसऱ्याच व्यक्तीच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला होता. या प्रकरणात मागच्या महिन्यात आरोप झाल्यावर महिला क्रिकेटरनं चूक मान्य केली. फोटो क्लिक केला त्यावेळी याबद्दल काहीच कल्पना नव्हती त्याचा परिणा काय होईल, तेही माहित नव्हते, अशा शब्दांत तिने आपली भूमिका मांडली होती