शारजाह : विलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी महागडा ठरला, असे सांगून राजस्थानविरुद्ध १६ धावांनी झालेल्या पराभवासाठी चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने आपल्या फिरकी गोलंदाजांना जबाबदार धरले आहे.
धोनी स्वत: सातव्या स्थानावर फलंदाजीला आला. यावर बरीच टीका झाली आहे. स्वत:चे समर्थन करताना तो म्हणाला, ‘१४ दिवसांच्या विलगीकरणाचा लाभ झाला नाही. मी कुरेनला संधी देत काही गोष्टी करून घेऊ इच्छित होतो, शिवाय डुप्लेसिस चांगला खेळत आहे. २१७ धावांचा पाठलाग करताना आमची सुरुवात चांगली झाली नाही. विजयाचे श्रेय रॉयल्सच्या गोलंदाजांना जाते.’जोस बटलर आणि रॉबिन उथप्पा यांच्यामुळे रॉयल्सकडे तीन यष्टिरक्षक आहेत. सॅमसनने चेन्नईविरुद्ध दोन फलंदाजांना यष्टिचित केले, याशिवाय दोन झेल घेतले. या जबाबदारीमुळे तो आनंदी आहे. तो म्हणाला, ‘प्रत्येकाला यष्टिरक्षण पसंत आहे, मात्र पॅड कोणी बांधावे हे कोच ठरवत असतो.’
रॉयल्सचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने संजू सॅमसनच्या फटकेबाजीचे कौतुक केले. तो म्हणाला, ‘संजू प्रत्येक चेंडूवर षटकार खेचतो की काय, असे वाटत होते. यापुढेही त्याची कामगिरी अशीच उंचावत जाईल, अशी आशा आहे.