Join us  

Yuzvendra Chahal: "मी सगळी तयारी केली होती...", ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमध्ये संधी न मिळाल्याने चहलने व्यक्त केली नाराजी

युजवेंद्र चहलला ट्वेंटी-20 विश्वचषकात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 7:20 PM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलला ट्वेंटी-20 विश्वचषकात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. तर 2021च्या विश्वचषकासाठी चहलची निवड देखील झाली नव्हती. अलीकडेच पार पडलेल्या विश्वचषकासाठी या फिरकीपटूची निवड झाली होती मात्र त्याला एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. याविषयी खुद्द चहलने भाष्य केले असून नाराजी व्यक्त केली आहे.

चहलने व्यक्त केली खदखद मी पूर्ण तयारी केली होती, पण निवडीसारख्या इतर गोष्टी माझ्या हातात नाहीत, अशा शब्दांत चहलने नाराजी व्यक्त केली. "संघात कॉम्बिनेशन असते, हा एक सांघिक खेळ आहे. रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल हे खेळत होते. सर्वजण चांगले खेळत होते. बाकी काही माझ्या हातात नाही. प्रशिक्षक आणि रोहित भाई निर्णय घेत होते. सगळ्यांनी मला तयार राहायला सांगितले होते. मी सगळी तयारी केली होती की कधी मला सामना खेळण्याची संधी मिळेल", असे चहलने आजतक या हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 

चहलने आणखी म्हटले, "दोन ट्वेंटी-20 विश्वचषक खेळू शकलो नाही तर काय झाले 2019 मध्ये वन डे वर्ल्ड कप खेळला होता. भारतीय संघासाठी खेळणे अभिमानाची गोष्ट आहे. मी फारसे इतर गोष्टींकडे लक्ष देत नाही. पुढच्या वर्षी वन डे विश्वचषक होणार आहे, मी त्याची तयारी करत आहे." 

चहलने फलंदाजीचा सराव करायला हवा? संघ व्यवस्थापनाने फलंदाजीचा पर्याय म्हणून विश्वचषकात संधी दिली नव्हती. यावर चहलनेही फलंदाजीचा सराव करावा का? असे विचारले असता त्याने उत्तरात म्हटले, "मी फलंदाजीचा 10-15 मिनिटे सराव करतो आणि प्रशिक्षक आणि कर्णधाराशी देखील चर्चा करतो. मी ज्युनिअर स्तरावर शतक झळकावले आहे. पण रणजी स्तरावर येताना मी फक्त गोलंदाजीवर लक्ष केंद्रित केले." 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२युजवेंद्र चहलबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघरोहित शर्मा
Open in App