दुखापतीमुळे मला शंभर टक्के कामगिरी करता आली नव्हती; हार्दिक पंड्याचे मोठे विधान

जेव्हा मी क्रिकेट खेळत होतो, तेव्हा भारतीय संघावर मी अन्याय केला आहे, असे पंड्याने म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 11:22 AM2019-12-10T11:22:48+5:302019-12-10T11:23:47+5:30

whatsapp join usJoin us
I did injustice to the Indian team; Big revelation of a Hardik pandya | दुखापतीमुळे मला शंभर टक्के कामगिरी करता आली नव्हती; हार्दिक पंड्याचे मोठे विधान

दुखापतीमुळे मला शंभर टक्के कामगिरी करता आली नव्हती; हार्दिक पंड्याचे मोठे विधान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. पण सध्या त्याने एक मोठा खुलासा केलेला आहे. जेव्हा मी क्रिकेट खेळत होतो, तेव्हा भारतीय संघावर मी अन्याय केला आहे, असे पंड्याने म्हटले आहे.

Image result for herdik pandya in lokmet

सध्याच्या घडीला पंड्या हा पाठिच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. या दुखापतीमुळे पंड्या गेल्या तीन महिन्यांपासून क्रिकेटपासून लांब आहे. आगामी ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकांमध्ये तो संघात पुनरागमन करू शकतो, असे म्हटले जात आहे.

Image result for herdik pandya in lokmet

हार्दिक पंड्याला पाठिची दुखापत ही मैदानात झालेली होती. ही दुखापत एवढी गंभीर स्वरुपाची होती की, त्याला स्ट्रेचरवरून मैदानातून बाहेर नेण्यात आले होते. त्यानंतर पंड्या काही सामने खेळला, पण या सामन्यांमध्ये त्याच्या कामगिरीमध्ये सातत्य पाहायला मिळाले नव्हते.

हार्दिक म्हणाला की, " मी भारतीय संघावर मोठा अन्याय केला आहे, असे मला वाटते. कारण मला दुखापत झाली होती. ती पूर्णपणे बरी झाली नव्हती. तरीदेखील मी खेळत होतो. त्यामुळे मी संघाला शंबर टक्के योगदान देऊ शकत नव्हतो. माझ्यामते मी भारतीय संघावर अन्याय केला आहे."

Web Title: I did injustice to the Indian team; Big revelation of a Hardik pandya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.