बंगळुरू - दिनेश कार्तिकचे तब्बल आठ वर्षानंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन करत आहे. दुखापतग्रस्त यष्टिरक्षक फलंदाज वृद्धीमान साहा याच्या जागी अफगाणिस्तान कसोटी सामन्यासाठी त्याची निवड करण्यात आली आहे. उदयापासून सुरु होणाऱ्या ऐतिहासिक सामन्यापूर्वी माध्यमांशी बोलताना दिनेश कार्तिक म्हणाला, भारतीय संधात स्थान मिळवण्यासाठी कमालीची चुरस होती आणि यापूढेही राहणार आहे. माल संघात स्थान मिळाले नाही कारण या काळात महेंद्रसिंग धोनीसारखा असामान्य, अद्वितीय खेळाडू संघात होता तर मला कसे काय स्थान मिळेल, असेही तो यावेळी म्हणाला. खेळाडू म्हणून माझ्यामध्ये किती बदल झाला हे माहीत नाही, पण मुलीच्या जन्मानंतर माझ्यामध्ये बदल घडून आला आहे असे कार्तिक म्हणाला.
2004मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिनेश कार्तिकने भारतीय कसोटी संघात पदार्पण केले होते. कार्तिकने 23 कसोटी सामन्यामध्ये 1,000 धावा केल्या आहेत. दिनेश कार्तिकने 87 कसोटी सामन्यांनंतर टीम इंडियाच्या चमूत स्थान मिळवलेय. याआधी पार्थिव पटेल याने 83 कसोटींनंतर हिंदुस्थानी संघात प्रवेश केला होता. यावर दिनेश कार्तिक म्हणाला, या कालावधीत माझ्याकडून अव्वल दर्जाची कामगिरीही होत नव्हती तर मग टीम इंडियात मला प्रवेश तरी कसा मिळेल.
Web Title: I did not get a place in the team due to Dhoni, but ... - Dinesh Karthik
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.