भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री आपल्या बिंधास्त शैलीसाठी ओळखले जातात. अनेकदा ते आपली मत अगदी परखडपणे मांडत असतात. दरम्यान, विराट आणि रोहित शर्मा यांच्यात कोणताही वाद नाही आणि त्यांच्यात उत्तम ताळमेळ आहे. माध्यमांसाठी हा केवळ एक टाईमपास आहे. या सगळ्या अतिशय वरवरच्या गोष्टी आहेत, आपल्याकडे अशा गोष्टींसाठी वेळ नसल्याचे रवी शास्त्री म्हणाले.
बोलताना रवी शास्त्री यांनी संघाचे प्रशिक्षक असतानाचा आपला अनुभवही शेअर केला. “ते अतिशय तणावाचं आणि मोठ्या जबाबदारीचं काम होतं. जेव्हा तुम्ही भारतीय संघाचे कोच बनता तेव्हा तुमच्याकडून अपेक्षाही असतात आणि जबाबदारीही. परंतु आता एक वर्ष होऊन गेलं, मी कॉमेंट्री करतोय,” असं रवी शास्त्री म्हणाले. नवभारत टाईम्सला दिलेल्या विशेष मुलाखतीत रवी शास्त्री यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.
“जी व्यक्ती आहे त्यानं तसंच राहिलं पाहिजे, बदल करू नये. जेव्हा तुम्ही तुमच्यापेक्षा एका छोट्या व्यक्तीला भेटता तेव्हा तेव्हा तुम्ही आहात तसंच भेटलं पाहिजे. या सात वर्षांत या जनरेशनसोबत राहून खूप मजा आली. तिकडे सर्वांसोबत काम करण्याचा वेगळाच अनुभव होता आणि त्यांनीही मला तरूणच ठेवलं,” असंही ते एका प्रश्नाचं उत्तर देताना म्हणाले. माझ्याकडे तितका वेळ नसतो आणि यासाठी आवडही हवी. जेव्हा माझी आवड निर्माण होईल आणि तेव्हा मी यात येईन. सोशल मीडियावर काय चर्चा होते याबाबत मला काहीही माहित नाही असं ते सोशल मीडियाबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलाताना म्हणाले.