२०२०त हेही बघायला मिळेल वाटलं नव्हतं; विराट कोहलीबाबत घडलं असं काही!

सर्वात मोठी ऑलिम्पिक स्पर्धाही स्थगित करावी लागली. इंग्लिश प्रीमिअर लीग, ला लिगा, बुंदेसलीगा, चॅम्पियन्स लीग, अमेरिकन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन या ऐतिहासिक स्पर्धांनाही कोरोनाचा मार सहन करावा लागला.

By स्वदेश घाणेकर | Published: December 22, 2020 09:55 AM2020-12-22T09:55:02+5:302020-12-22T09:55:18+5:30

whatsapp join usJoin us
I didn't expect to see this in 2020; India captain Virat Kohli goes century-less in 2020 | २०२०त हेही बघायला मिळेल वाटलं नव्हतं; विराट कोहलीबाबत घडलं असं काही!

२०२०त हेही बघायला मिळेल वाटलं नव्हतं; विराट कोहलीबाबत घडलं असं काही!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

२०२० हे वर्ष कुणीच विसरणार नाही... एका विषाणूनं संपूर्ण जगाला वेठीस धरलं. क्रीडा स्पर्धांची तर वाटच लावली. इंडियन प्रीमिअर लीग भारताबाहेर झाली, ऑस्ट्रेलियात होणारी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप रद्द करावा लागला, आशिया कप गुंडाळावा लागला. एवढंच काय तर सर्वात मोठी ऑलिम्पिक स्पर्धाही स्थगित करावी लागली. इंग्लिश प्रीमिअर लीग, ला लिगा, बुंदेसलीगा, चॅम्पियन्स लीग, अमेरिकन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन या ऐतिहासिक स्पर्धांनाही कोरोनाचा मार सहन करावा लागला. पण, हे वर्ष सरतासरता भारतीय क्रिकेटलाही धक्का देऊन गेलं. भारतीय संघ कसोटीत ३६ धावांवर गारद झाला. जगातील सर्वात तगडी फलंदाजांची फौज असलेला संघ एवढ्या कमी धावांत तंबूत जाईल, असा विचारही कुणी केला नसावा. पण, तेही घडलं... टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याच्याबाबतही नकोशी कामगिरी घडली.

२०१८-१९च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकणारा भारतीय संघ पुन्हा ऑसींना पराभूत करण्यासाठी सज्ज होता. अनेक अडचणींचा सामना करतानाही टीम इंडिया यजमानांना सडेतोड उत्तर देईल, अशी अपेक्षा होती. पण, जे घडलं ते अनपेक्षित होतं. क्रिकेटप्रेमींच्या मनावर त्या एका तासाच्या खेळानं खूप खोलवर परिणाम नक्की केला असावा. विराटच्या चाहत्यांसाठी तर आणखी धक्कादायक बाब म्हणजे यंदाच्यात कॅप्टन कोहलीला एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावता आलेले नाही. २००८ नंतर विराटवर प्रथमच अशी नामुष्की ओढावली आहे. पहिल्या कसोटीनंतर विराट पत्नी अनुष्काच्या बाळंतपणासाठी मायदेशी परतणार आहे. त्यामुळे अॅडलेड कसोटी ही २०२०मधील त्याची अखेरची आंतरराष्ट्रीय मॅच ठरली. अॅडलेड कसोटीत विराटनं पहिल्या डावात ७४ धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या डावात ४ धावा करू शकला. २२ नोव्हेंबर २०१९मध्ये विराटनं ( १३६ धावा) बांगलादेशिवरुद्धच्या डे नाइट कसोटीत अखेरचे शतक झळकावले होते. त्यानंतर २०२०मध्ये त्याची कसोटीतील पाटी कोरीच राहिली.

कोहलीची कसोटी क्रिकेटमधील २०२० कॅलेंडर वर्षातील कामगिरी 
२ ,१९ वि. न्यूझीलंड, वेलिंग्टन
३, १४ वि. न्यूझीलंड, ख्राईस्टचर्च
७४, ४ वि. ऑस्ट्रेलिया, अॅडलेड

कॅलेंडर वर्षात २००८नंतर प्रथच विराटला वन डे क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावता आलेले नाही. वन डे क्रिकेटमधील पदार्पणानंतर दुसऱ्यांदा कॅलेंडर वर्षात विराट शतक झळकावण्यात अयपशी ठरला आहे. विराटनं १४ ऑगस्ट २०१९मध्ये अखेरचे वन डे शतक झळकावले आहे. त्यानं वेस्ट इंडिजविरुद्ध ९९ चेंडूंत नाबाद ११४ धावा केल्या होत्या.  

विराट कोहलीची वन डे क्रिकेटमधील ( शतक) कॅलेंडर वर्षातील कामगिरी 
2008 - 0 
2009 - 1 
2010 - 3
2011 - 4
2012 - 5
2013 - 4
2014 - 4
2015 - 2
2016 - 3
2017 - 6
2018 - 6
2019 - 5 
2020 - 0
 

Web Title: I didn't expect to see this in 2020; India captain Virat Kohli goes century-less in 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.