Join us  

India vs South Africa: 'टीम इंडिया जिंकेल असं वाटत नाही'; का बरं असं म्हणाला असेल भारताचा माजी क्रिकेटपटू

दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत भारताने एकदाही कसोटी मालिका जिंकलेली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 8:15 PM

Open in App

भारतीय संघ उद्यापासून आफ्रिकेविरूद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. पहिली कसोटी २६ ते ३० डिसेंबर दरम्यान रंगणार आहे. या कसोटी मालिकेसाठी विराट कोहली कर्णधारपदी आहे पण उपकर्णधार असलेल्या रोहित शर्माला दुखापत झाल्याने त्याने मालिकेतून माघार घेतली आहे. त्याच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलला ही जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या फॉर्मकडेही साऱ्यांचे लक्ष असणार आहेत. अशातच भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने भारतीय संघ ही मालिका जिंकेल असं वाटत नाही असं थेट विधान केल आहे.

"टीम इंडिया ही मालिका जिंकेल असं सध्या तरी वाटत नाही. माझ्या मते हे खूपच कठीण आहे. एन्रीक नॉर्खिया खेळत असता तर मी म्हटलं असतं की दक्षिण आफ्रिका २-१ अशी मालिका जिंकेल. पण आता नॉर्खिया संघात नसल्याने मला असं वाटतं की ही मालिका १-१ अशी बरोबरीत सुटेल. १ कसोटी सामना अनिर्णित राहिल असं मला वाटतंय. कारणं तसंही पहिल्या कसोटीवर पावसाचं सावट आहे", असं आकाश चोप्रा म्हणाला.

"दोन्ही संघांकडे चांगले खेळाडू आहेत. नव्या आणि अनुभवी खेळाडूंचा चांगला समतोल दोन्ही संघात दिसून येतो. अशा परिस्थितीत मला तरी असं वाटतं की ही कसोटी मालिका बरोबरीत सुटेल. सध्याच्या घडीला ५१ टक्के दक्षिण आफ्रिका आणि ४९ टक्के भारत असा माझा अंदाज आहे. आता तरी मला असंच वाटतंय. पण जर मालिका एखादा संघ जिंकतच असेल तर तो दक्षिण आफ्रिकेचाच संघ असेल", असंही आकाश चोप्रा म्हणाला.

भारताचा कसोटी संघ - विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, प्रियांक पांचाल, श्रेयस अय्यर, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, जयंत यादव, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, इशांत शर्मा

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघ
Open in App