मुंबईः भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी 31 जुलैपासून काश्मीर खोऱ्यात भारतीय सैन्यासोबत पहारा देणार आहे. सैन्य प्रशिक्षण घेण्यासाठी कॅप्टन कूल धोनी भारतीय सैन्याच्या पॅराशूट रेजिमेंटच्या बंगळुरू येथील मुख्यालयात बुधवारी दाखल झाला. भारतीय सैन्याची सेवा करता यावी यासाठी धोनीनं टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार घेतली आहे.
त्यावर सैन्यदलाचे प्रमुख बिपीन रावत यांनी सांगितले की,''धोनी सुरक्षा पुरवण्याची आवश्यकता नाही, तो देशवासियांची सुरक्षा करू शकतो. सैन्यात भरती होण्याचे जे स्वप्न पाहतात ते सर्व प्रसंगांना सामोरे जाण्याची धमक राखतात. धोनीनंही प्रशिक्षण घेतलं आहे आणि तो देशातील नागरिकांचे संरक्षण करू शकतो. धोनी आता धोनी हा 106 टेरिटॉरियर आर्मी बटालियनचा सदस्य ( पॅरा) आहे. त्यामुळे तो अनेकांचे रक्षण करू शकतो. त्यामुळे त्याला सुरक्षा पुरवण्याची गरज लागेल, असे मला वाटत नाही. तोच नागरिकांची सुरक्षा करू शकतो.''
कॅप्टन कूल धोनीचं देशप्रेम दिखाऊ नाही, पाहा हे PHOTO
भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. 3 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहे. धोनी मात्र या दौऱ्याचा सदस्य नसणार आहे. 31 जुलै तो 15 ऑगस्ट या कालावधीत काश्मीर खोऱ्यात व्हिक्टर फोर्ससोबत पेट्रोलिंग करणार आहे.
महेंद्रसिंग धोनीचं सर डॉन ब्रॅडमन यांच्या पावलावर पाऊलसैन्यसेवत दाखल होणारा धोनी हा पहिलाच क्रिकेटपटू नाही. भारतीय कसोटी संघाचे पहिले कर्णधार कॉलोनेल कोट्टारी कनकिया नायुडू हेही सैन्यात होते. शिवाय लेफ्टनन कॉलोनेल हेमू अधिकारी यांचे कसोटी पदार्पण वर्ल्ड वॉर टू मुळे लांबणीवर पडले होते. त्यांनीही सैन्यसेवा केली आहे. त्यानंतर चंद्रशेखर गडकरी, नरैन स्वामी, रमन सुरेंद्रनाथ, अपूर्वा सेनगुप्ता आणि वेनाटप्पा यांनीही सैन्यसेवा केली आहे.
महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन हेही लेफ्टनन होते. त्यांनी जून 1940साली ऑस्ट्रेलियन एअर फोर्स जॉईन केली होती. त्यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियन आर्मीत ट्रान्सफर घेतली आणि त्याचे प्रशिक्षणही त्याने घेतले. पण, त्यांच्या प्रकृतीत वैद्यकीय दोष आढळल्यामुळे त्यांना जून 1941मध्ये सैन्यातून निवृत्त करण्यात आले. इंग्लंडच्या सर लेन हटन यांनीही सहा वर्ष सैन्य प्रशिक्षण घेतले. तेथे त्यांच्या मनगटाला दुखापत झाली आणि त्याचा क्रिकेट कारकिर्दीवरही परिणाम झाला.