Join us  

'पहिल्यांदाच वाटलं, या जगातील माझे जीवन...'; कार अपघातावर रिषभ पंत उघडपणे बोलला!

भारतीय क्रिकेट यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंतच्या कारला ३० डिसेंबर २०२२ रोजी दिल्लीहून घरी परतत असताना अपघात झाला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 11:03 AM

Open in App

भारतीय क्रिकेट यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंतच्या कारला ३० डिसेंबर २०२२ रोजी दिल्लीहून घरी परतत असताना अपघात झाला होता आणि तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूर आहे. रिषभ पंत पुनरागमनासाठी कठोर मेहनत घेतोय. याचदरम्यान रिषभ पंत कार अपघातावर पहिल्यांदाच उघडपणे बोलला आहे. 

भीषण अपघाताबाबत स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत रिषभ पंत म्हणाला की, ३० डिसेंबर २०२२ रोजी सकाळी माझी कार रेलिंगला धडकली. यानंतर मर्सिडीज कारला आग लागली. यावेळी माझा मृत्यू होईल, असं मला त्याक्षणी जाणवले. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मला वाटले की, या जगातील माझे जीवन संपले आहे. अपघातादरम्यान झालेल्या दुखापतींबद्दल मला माहिती होती, परंतु मी नशीबवान होतो, असं पंत म्हणाला. 

रिषभ पंत म्हणाला, 'काही क्षणानंतर मला जाणीव झाली की, कोणीतरी मला वाचवले आहे. अपघात एवढा मोठा होऊ शकतो हे देखील मला माहीत नव्हते. अशा अपघातानंतरही मी जिवंत होतो,असं पंतने सांगितले. मी डॉक्टरांना विचारले की, मला बरे होण्यासाठी किती वेळ लागेल. त्यासाठी १६ ते १८ महिने लागतील, असे ते म्हणाले. हा रिकव्हरी टाईम कमी करण्यासाठी मला खूप मेहनत करावी लागेल हे मला माहीत होते. 

दरम्यान, अपघातामुळे पंतवर मुंबईत शस्त्रक्रिया करावी लागली आणि तो आयपीएलमध्ये पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षी दुबई येथे आयपीएल २०२४च्या लिलावादरम्यान फ्रँचायझी प्रतिनिधी मंडळाचा भाग झाल्यानंतर आगामी आयपीएलमध्ये पंत दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करेल अशी अपेक्षा आहे. ऋषभ पंतने आतापर्यंत ३३ कसोटी सामन्यांमध्ये ४३.६७च्या सरासरीने २२७१ धावा केल्या आहेत. ज्यात ५ शतके आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने ६६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तीन अर्धशतकांच्या मदतीने ९८७ धावा केल्या आहेत. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय बद्दल बोलायचे तर, पंतने ३० सामन्यांमध्ये ३४.६०च्या सरासरीने ८६५ धावा (१ शतक, ५ अर्धशतके) केल्या आहेत.

टॅग्स :रिषभ पंतअपघातआयपीएल २०२३भारतीय क्रिकेट संघ