IPL 2021: भारतातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेली आयपीएल स्पर्धा सुरू ठेवावी की रद्द करावी यावरुन मतमतांतरं सुरू असताना इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन यांनीही आता त्यांचं मत व्यक्त केलं आहे.
मोठी बातमी : कोरोना संकटात भारत ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचं यजमानपद गमावणार; नव्या पर्यायानं पाकिस्तानात आनंद!
आयपीएल स्पर्धा न थांबवता नियोजित वेळापत्राकानुसारच सुरू ठेवावी असं मत मायकल वॉन यांनी व्यक्त केलं आहे. सध्याच्या कठीण काळात आयपीएलमधून क्रिकेट चाहत्यांचं मनोरंजन होत आहे ही देखील अतिशय महत्वाची गोष्ट आहे, असं वॉन म्हणाले. पण इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेत खेळण्यापासून परवानगी नाकारण्यात आली. मग भारतात खेळण्याची परवानगी कशी काय दिली गेली यामागचं कोडं काही उलगडू शकलेलं नाही, असं वॉन यांनी म्हटलं आहे. (I find it tough to think how England and Australian players are allowed to play in India says Michael Vaughan)
IPL : पैसे देण्याचीही दानत असावी लागते, हे दाखवून दिलं, आव्हाडांनी मानले पॅटचे आभार
आयपीएलच्या यंदाच्या सीझनला ९ एप्रिलपासून सुरुवात झाली असून ३० मे रोजी स्पर्धेचा अंतिम सामना नियोजित आहे. सध्या गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्ज संघ अव्वल स्थानावर असून गेल्या ५ सामन्यांमध्ये चेन्नईनं चार सामन्यांमध्ये विजय प्राप्त केला आहे. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादचा संघ केवळ एक सामना जिंकून गुणतालिकेत सर्वात शेवटच्या म्हणजेच आठव्या क्रमांकावर आहे.
'असं केलं तर कुणीही कॅप्टन होईल'; KKR च्या 'कोड मेसेज'वर सेहवाग भडकला!, नेमका प्रकार काय?
भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत दिवसाला ३ लाखांहून अधिक नवे रुग्ण वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाच्या काही क्रिकेटपटूंनी आयपीएलमधून माघार घेतली. यात अँड्रयू टाय, अॅडम झम्पा, केन रिचर्डसन यांचा समावेश आहे. तर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ देखील स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर मायकल वॉन यांनी मुळात कोरोनाचं संकट असताना सुरुवातीलाच परवानगी कशी दिली असा सवाल उपस्थित करुन स्पर्धा अर्ध्यावर सोडून जाणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे.
Web Title: I find it tough to think how England and Australian players are allowed to play in India says Michael Vaughan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.