फिनिक्स भरारी कशी घ्यायची, हे तमाम क्रिकेट चाहत्यानं भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानं शिकवलं. नियमित कर्णधार विराट कोहली रजेवर गेल्यानंतर संघातील एकेक प्रमुख गोलंदाज जायबंदी होऊन माघारी परतत होते. त्यात ३६ ऑल आऊट ही लाजीरवाणी कामगिरीचं दडपण डोक्यावर होतेच... त्यातूनही टीम इंडियानं मुसंडी मारली आणि सर्व अडथळ्यांवर स्वार होत २-१ असा ऐतिहासिक विजय मिळवला. रिषभ पंत, मोहम्मद सिराज, टी नटराजन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर या युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीनं हा दौरा गाजवला. पण, या विजयामागे एका व्यक्तिचं योगदान हे न विसरण्यासारखे आहे. ती व्यक्ती म्हणजे टीम इंडियाच्या कसोटी संघातील नवा दी वॉल चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara)....
पुजारानं २०१८-१९च्या ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयातही सिंहाचा वाटा उचलला होता. यंदाही त्याच्याकडून तशीच अपेक्षा होती आणि त्यावर तो खरा उतरला. त्यानं ८ डावांत तीन अर्धशतकांसह २७१ धावा चोपल्या. या मालिकेत रिषभ पंतनंतर ( २७४) भारताकडून सर्वाधिक धावा पुजारानं केल्या. पण, या दौऱ्यात सर्वाधिक ९२८ चेंडूंचा सामना पुजारानं करून ऑसी गोलंदाजांना रडवले. पुजाराला बाद करण्यासाठी मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड यांनी त्याच्या शरिरावर मारा केला. ते सर्व चेंडू अंगावर झेलून पुजारा अभेद्य भींतीसारखा खेळपट्टीवर उभा राहिला. पुजाराच्या त्या खेळीचे सर्वांनी कौतुक केलं. नव्या घराच्या शोधात आहे रिषभ पंत; इरफान पठाणसह नेटिझन्सनं दिला हटके सल्ला
पुजारा म्हणाला की, "संघाला माझ्याकडून असलेल्या अपेक्षांवर मी खरे उतरलो, याचा आनंद आहे. ऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी खडतर होता. चार बोटांनी फलंदाजी करायचीही वेळ माझ्यावर आली होती. ही गोष्ट साधारण नव्हती, पण संघासाठी खेळपट्टीवर टिकून राहण्याची जबाबदारी माझ्यावर होती. मेलबर्नवर सराव करताना मला दुखापत झाली होती. त्यामुळे सिडनी आणि ब्रिस्बेन येथे फलंदाजी करणे सोपे नव्हते. हाताला वेदनाही होत होत्या. त्यावेळी बॅट पकडायलाही जमत नव्हती. ब्रिस्बेनमध्ये पुन्हा दुखापत झाली. त्यामुळे वेदना वाढल्या. मी फक्त चार बोटांनीच बॅट पकडली होती." एकेकाळी लोकल ट्रेनमध्येही कोणी ओळखलं नव्हतं... पण आता ही मराठमोळी व्यक्ती आहे टीम इंडियाचा स्टार खेळाडू
''प्रतिस्पर्धी आक्रमण करून थकल्यानंतर माझा पलटवार सुरू होतो. हाच माझा गेम प्लान होता. तुमच्यात ताकद असेपर्यंत मला पंच मारा, त्यानंतर मी माझा पंच दाखवतो. पहिला चेंडू माझ्या खांद्यावर आदळला, त्यानंतर पोटावर आणि त्यानंतर पुन्हा खांद्यावर. ऑसी गोलंदाज वारंवार त्याच त्याच भागावर चेंडूचा मारा करू लागले. हेल्मेटवर चेंडू आदळल्यानंतर मीही घाबरलो होतो. थोड्या वेदना होत होत्या, पण मी थांबलो नाही. माझ्या बोटावर आदळलेला चेंडू प्रचंड वेदना देणारा होता. मला वाटलं की बोट मोडलं,''असेही पुजारा म्हणाला.