ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांनी बुधवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल केला. त्यात एक महिला गोल्फ खेळून मांजरीकडून क्षेत्ररक्षणाचा सराव करून घेताना पाहायला मिळत आहे. चेंडू पकडण्यासाठी मांजरीनं दाखवलेली चपळता आणि तिचा अचुकपणा पाहून जोन्स थक्क झाले. असा क्षेत्ररक्षक मिळणार नाही, अशी खात्री त्यांनी दिली. जोन्स यांनी 52 कसोटी, 164 वन डे सामन्यांत ऑस्ट्रेलियन संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आता ते क्रिकेट समालोचकाच्या भूमिकेत आहेत. त्यांच्या नावावार कसोटी 3631 धावा आणि वन डेत 6068 धावा आहेत.
पाहा व्हिडीओ...
दरम्या, जोन्स यांनी संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल) बद्दल भाष्य केले. ते म्हणाले, यूएईत तीन दुबई, शाहजाह आणि अबु धाबी अशी तीन मैदानं आहेत. मी तेथे पाकिस्तान सुपर लीगसाठी गेलो होतो आणि तेथे मी संघाला मार्गदर्शन केले. येथे फिरकीपटूंना चांगली मदत मिळू शकते. त्यामुळे काही संघ तीन फिरकीपटू खेळवू शकतात. सुरुवातीला खेळपट्टी फलंदाजांना मदत करेल. स्पर्धा जसजशी पुढे सरकेल, तेव्हा खेळाडूंत थकवा जाणवेल.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
शाब्बास! महाराष्ट्राच्या सुपुत्राची आनंद महिंद्रांनी थोपटली पाठ; भन्नाट आयडिया भन्नाट आवडली
भगवान रामाने प्रत्येकाचा चांगुलपणा पाहिला; मोहम्मद कैफच्या ट्विटनं जिंकली मनं
अयोध्या तो झांकी है उसके बाद भी बहुत कुछ बाकी है!; बबिता फोगाटचे ट्विट व्हायरल
आयर्लंडकडून 2011च्या वर्ल्ड कप मधील विजयाची पुनरावृत्ती; इंग्लंडला दिली मात
'तो' वर्ल्ड रेकॉर्ड महेंद्रसिंग धोनीच्या नावावर राहिला नाही; इयॉन मॉर्गनची सरशी
Web Title: I have seen worst fielders I can assure you!, Dean jones share funny Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.