Join us  

सूर्यकुमार यादवला संघात स्थान का नाही? हरभजन सिंग संतापला

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) सोमवारी आगामी श्रीलंका ( ट्वेंटी-20) आणि ऑस्ट्रेलिया ( वन डे ) यांच्यावविरुद्धच्या मालिकांसाठी टीम इंडियाची घोषणा केली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 3:26 PM

Open in App

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) सोमवारी आगामी श्रीलंका ( ट्वेंटी-20) आणि ऑस्ट्रेलिया ( वन डे ) यांच्यावविरुद्धच्या मालिकांसाठी टीम इंडियाची घोषणा केली. या मालिकेतून जसप्रीत बुमराह आणि शिखर धवन टीम इंडियात पुनरागमन करणार आहेत. रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मालिकेसाठी सूर्यकुमार यादव याच्या नावाचा विचार केला जाईल अशी अपेक्षा होती, परंतु याहीवेळेस त्याच्या वाट्याला निराशा आली. 

सूर्यकुमार हा 29 वर्षांचा आहे आणि स्थानिक व आयपीएलमधील त्याचा फॉर्म बोलका आहे. सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20त त्यानं 11 सामन्यांत 56च्या सरासरीनं 392 धावा केल्या आहेत. त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 70 सामन्यांत 43.53च्या सरासरीनं 4920 धावा केल्या आहेत. 149 ट्वेंटी-20त सूर्यकुमारनं 3012 धावा केल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियातील त्याचा प्रवेश निश्चित मानला जात होता. पण, निवड समितीनं आताही त्याच्याकडे काणाडोळा केला. पण, न्यूझीलंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारत अ संघाच्या वन डे मालिकेसाठी त्याची निवड झाली आहे.

सूर्यकुमारला संघात स्थान न मिळाल्यानं टीम इंडियाचा दिग्गज फिरकीपटून हरभजन सिंग चांगलाच संतापला. त्यानं ट्विट करून आपला राग व्यक्त केला. तो म्हणाला,''सूर्यकुमार यादवनं असं कोणती चूक केली आहे, हे मला जाणून घ्यायला आवडेल. सातत्यानं धावा करूनही त्याला संघात स्थान का मिळत नाही? प्रत्येक खेळाडूंसाठी वेगवेगळा नियम का? भारत अ संघ ( तीन वन डे साठी आणि दोन दौऱ्यावरील सामन्यांसाठी ) - पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल, ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल ( कर्णधार), सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन ( यष्टिरक्षक), कृणाल पांड्या, अक्षर पटेल, राहुल चहर, संदीप वॉरियर, इशांन पोरेल, खलील अहमदस मोहम्मद सिराज  

टॅग्स :हरभजन सिंगभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय